spot_img
अहमदनगरनीलेश लंके साहेब, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसीचं राहू द्या! सुप्यातील उद्योजक बाहेर जाताहेत...

नीलेश लंके साहेब, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसीचं राहू द्या! सुप्यातील उद्योजक बाहेर जाताहेत त्यांचं बोला!

spot_img

निघृण हत्या करून नारायणगव्हाण येथील विहिरीत मारवाडी समाजातील तरुणाचा मृतदेह सापडला; त्याचं पुढे काय झाले?
ग्राउंड रिपोर्ट | शिवाजी शिर्के
निवडून आल्यानंतर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी काढणार असल्याचं जाहीर आश्वासन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी दिलंय! खरंतर यातून औद्योगिकरण वाढेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेलही! मात्र, नीलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील सुपा येथील औद्योगिक वसाहतीची आज काय अवस्था आहे? बाळासाहेब विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आमदार झालेल्या नंदकुमार झावरे यांच्या कारकिर्दीत ही एमआयडीसी येथे आली. बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यावेळी यासाठी याभागाचे खासदार म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्याचा प्रस्ताव नंदकुमार झावरे यांनी शासन दरबारी सादर केला. या एमआयडीसीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून मध्यंतरी जापनीज हब तयार करण्यात आला. मात्र, यातील काही कंपन्यांनी लागलीच काढता पाय घेतला. स्थानिक काही कंपन्या येथे असल्या तरी त्यांना मोठ्या दहशतीला सामोरे जावे लागते. कंपनीला लागणारी बांधकामासाठीची वाळू, सिमेंट, स्टील यासह जेसीबी- पोकलॅन, डंपर आदी साहित्य- मशिनरी इथपासून ते लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी कंपन्यांच्या अधिकार्‍यांना प्रसंगी मारहाणही करण्यात आली. पोलिसात प्रकरण नेण्याची हिम्मत सुद्धा कोणी केली नाही. आज येथील उद्योग बाहेर जात असताना व काही गाशा गुंडाळण्याच्या मार्गावर आहेत. शेजारी रांजणगाव एमआयडीसी शिरुरपर्यंत आली आणि इकडे औरंगाबादकडून नेवासा फाटा-पांढरीपूल पर्यंत कंपन्या आल्या असताना सुप्यातील इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंटच्या आड कोण आणि कशापद्धतीने आले याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे.

लंके समर्थक आताच देऊ लागलेत तेरावा घालण्याची धमकी!
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून अद्याप अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत. प्रचाराच्या बैठकांचे नियोजन काही उमेदवार करत आहेत तर काही गाठीभेठी! शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा प्रारंभ नुकताच झाला. पाथर्डी- शेवगाव तालुक्यात सध्या त्यांच्या बैठका चालू आहेत. लंके यांच्या काही कार्यकर्त्यांचा अतिउत्साह त्यांना कायमच अडचणीत टाकत आला आहे. त्यांच्या एका खंद्या आणि तितक्याच जबाबदार समर्थकाने त्याच्या व्हॉटस अप स्टेटसवर ठेवलेली पोस्ट सध्या जिल्हाभरात व्हायरल होत आहे. ‘लोकनेते ११० टक्के खासदार होत असत्यात. कोणाला त्यांच्या विरोधात किती अपप्रचार करुन घ्यायचाय तेव्हढा करुन घ्या, ताकद लावायची तेवढी लावा, नंतर आम्ही आहोतच तुमचा तेरावा घालायला!’, असा आशय असणारी ही पोस्ट मतदारांसह विरोधकांना धमकावत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच या धमक्या सुरू असतील तर प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर पडणारे मुडदे, त्यांचे दहावे आणि पुढे तेरावे याचेही आतापासूनच नियोजन करण्यात आल्याचे हे बोलके उदाहरण आहे.

पारनेर तालुक्यात गुरुजी फाशीला अन् गुंड काशीला; सुतार समाजाचा मास्तर अण्णांच्या राळेगणसिद्धीत चोपला!
राज्याला शिक्षक पुरविणार्‍या पारनेर तालुयात ‘गुरूजी फाशीला अन् गुंड काशीला’ अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. वाडेगव्हाण येथील जि.प. शाळेवर कार्यरत असणारे सुतार समाजाचे राळेगण सिद्धी येथील प्राथमिक शिक्षकास शाळेत येऊन मारहाण करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीला पाठीशी कोणी घातले हे सर्वश्रूत आहे. आपल्या गावोगावच्या हस्तकांमार्फत तयार करण्यात आलेली खोटी प्रतिमा अन् त्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच चर्चेतून ‘नेते’, ‘लोकनेते’ ‘अत्यंत गरीब’, ‘सेवेकरी’ व ‘साधे भोळे’ या उपाध्या आहेत. मात्र, या उपाध्यांच्या आड लपलेली गुंडगिरी तालुका आणि जिल्ह्यासाठी अत्यंत भयानक असून हेच विदारक वास्तव आहे. अण्णांच्या राळेगणसिद्धीतील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणारा सुतार समाजाचा शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसमोर आणि अण्णांच्या गावात चोपण्याचे धाडस कोणाच्या पाठबळावर झाले? आजही हा शिक्षक न्याय मागण्यासाठी दारोदार भटकत आहे.

‘ए… कलेक्टर’च्या आधी झाला होता, ‘ए… बीडीओचा ट्रेलर’!
कोवीड कालावधीत कोव्हीड रुग्णांच्या सादर करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पथकातील गायकवाड या अधिकार्‍यासह त्याच्यासोबतच्या कर्मचार्‍यांना गट विकास अधिकार्‍यासमोर दमदाटी करण्यात आली. चल… उठ… निघ…. काय उखडायचं ते उखड, करायचं ते कर’, अशी भाषा कोणी वापरली? तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या पदावर काम करणार्‍या अधिकार्‍यांना जनतेसमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा अपमानीत केले. सत्तेतील आमदार आणि त्यातही दोन्ही पवारांच्या मांडीवर बसलेला आमदार त्यामुळे अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड दहशत! बीडीओसह त्यांच्या पथकाला हाकलून दिल्यानंतरही त्याबाबत साधी तक्रार देखील झाली नाही हे विशेष!

रोहित पवारांची बारामती अ‍ॅग्रो देखील सुटली नाही!
सुपा औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजक विधानसभा निकालानंतर अवास्तव मागण्यांना आणि चोचल्यांना वैतागलेत! आता लोकसभेचा निकाल त्यांच्या बाजूने लागला तर आपली काहीच खैर नाही ही भावना त्यांच्यात आतापासूनच वाढीस लागली आहे. शरद पवार यांचे नातू असणार्‍या व आमदार असणार्‍या रोहीत पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोचे एक युनीट सुप्यात आहे. या युनीटमधून हप्ते वसूल केले जात आहेत. ही आमदाराशी संबंधीत कंपनी असतानाही जर त्यांना स्थानिक त्रास होत असेल तर त्याची जबाबदारी नक्की कोणाची? रोहीत पवार यांनीच याचे उत्तर देण्याची आवश्यकता आहे.

सुप्याच्या कंपनीत अधिकारी असलेला ज्येष्ठ पत्रकाराचा भाऊ देखील ठरला दडपशाही, दादागिरीचा बळी!
सुप्यातील कंपन्यांना संरक्षण देत असल्याचा कांगावा करणार्‍यांनी तेथे किती आणि कशी दहशत माजवली आहे याचा अनुभव कंपन्यांसह त्यांच्या अधिकार्‍यांना आहे. प्रचंड दहशत आणि दबावामुळे कोणी काही बोलायला तयार नाही. सुप्यातील एका कंपनीत राज्यस्तरीय साखळी वृत्तपत्राचे नगरमधील प्रमुख असणार्‍या पत्रकाराचे बंधू व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांना तेथे काम करत असताना याच कथीत भोळ्या चेहर्‍याने धमकावण्यास प्रारंभ केला आणि अव्वाच्यासव्वा मागण्या त्याच्या पुढ्यात ठेवल्या. त्या मागण्या आपण पूर्ण करु शकत नसल्याचे या पत्रकाराच्या व्यवस्थापकाने हात जोडून सांगितले. मात्र, साळसुदपणाचा आव आणणार्‍या व स्वत:ला गरीबांचा मसिहा म्हणवून घेणार्‍याने त्या व्यवस्थापकाला त्रास देण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या सुरु केल्या. यानंतर ही बाब त्याने नगरमध्ये पत्रकार म्हणून काम करत असलेल्या आपल्या भावाला सांगितली. त्या पत्रकाराने ही बाब त्यावेळच्या त्याच्या ‘बाबो’ बॉसला सांगितली. हा बॉस म्हणजे सुप्यातील त्या कथीत बाळबोधची दुसरी आवृत्ती! त्या बॉसने सुप्यावाल्यालाच पाठीशी घातले. पत्रकार असूनही आपल्या भावाला आपण न्याय देऊ शकत नसल्याची सल त्यावेळी या पत्रकाराला खूपच खटकली! प्रगती करायची असेल तर सुपा सोडून जा असा सल्ला या पत्रकाराने आपल्या भावाला दिला. आता या पत्रकाराचा भाऊ पुण्यातील एका नामवंत कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत आहे. या ज्येष्ठ पत्रकाराने त्याच्यावर बितलेली ही आपभिती स्वत:हून सांगितलीय हे विशेष! सुपा एमआयडीसीतील गुंडगीरीचा पर्दाफाश होण्यासाठी आता असे अनेक चेहरे समोर येत आहेत! संपादक पदावर काम करत असलेल्या पत्रकाराच्या सख्ख्या भावाला धमकावण्याची हिम्मत होत असेल तर बाकीच्यांबद्दल काय बोलावे आणि काय लिहावे!

गाडी अंगावर घालून शिक्षकाचा मुडदा पाडणारा आरोपी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या अध्यक्षाचा सख्खा भाऊ!
टाकळी ढोकेश्वर या आपल्या मुळ गावी आलेल्या परंतू रुंभोडी (अकोले) येथे प्राथमिक शिक्षक असणार्‍या सोनार समाजातील उदावंत या शिक्षकाचा कर्जुले घाटात अंगावर गाडी घालून खून करण्यात आला. यातील आरोपीला बरेच दिवस पारनेर पोलिसांनी पाठीशी घातले. याबाबत बसमधून प्रवास करणार्‍या जागृत नागरिकाने ऑनलाईन तक्रार केली आणि त्याचा पाठपुरावा झाल्यानंतर संबंधितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तरीही आरोपी मोकाट सोडण्यात त्यावेळचे विमान प्रवासाची बक्षिसी मिळालेल्या पोलिस निरीक्षकाने धन्यता मानली. यातील आरोपी नीलेश लंके यांच्याशी संबंधीत प्रतिष्ठानचा तत्कालीन तालुकाध्यक्ष व बाजार समितीचा विद्यमान सभापती भाऊसाहेब उर्फ बापू शिर्के याचा सख्खा भाऊच निघाला. त्याला अटकही झाली. मात्र, नेत्यांची चलती आणि आशीर्वाद यातून तो काही दिवसात बाहेर आला. शिक्षकाचा भरदिवसा गाडी खाली घालून खून करण्यात आला असताना त्यातील खुन्यांना पाठीशी घालण्याचे पाप कोणी केले याची चर्चा आजही थांबायला तयार नाही. या शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याची साधी तसदी घेण्याचे काम आजपर्यंत नीलेश लंके यांनी केले नाही.

एमआयडीसी राज्य सरकार मंजूर करते की केंद्र सरकार?
प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी काढण्याचं आश्वासन देण्यात आलंच आहे तर एमआयडीसी मंजूर करण्याचे काम कोणाचे या प्रश्नाचे उत्तर देखील शोधण्याची गरज आहे. आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर शरद पवार यांचे मानसपुत्र असल्यागत त्यांच्या उजव्या मांडीवर बसून फायद्याच्या अनेक गोष्टी करुन घेतल्या! पुढे दोन्ही पवार विभक्त होताच अजित पवार यांच्या मांडीवर बसून तेच करुन घेतले. आता पुन्हा शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन ते बसलेत! साडेचार वर्षात इकडून तिकडे अन तिकडून इकडे उड्या मारत असताना एमआयडीसी मंजूर करण्याचे अधिकार राज्य सरकारला असतात हे नक्कीच त्यांना समजले असणार! विधानसभेचा राजीनामा देऊन लोकसभेचा उमेदवार म्हणून मते मागताना प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलंय! केंद्र सरकारशी निगडीत हा विषय नक्कीच नाही. मग, या सहा एमआयडीसी ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून येणार त्या राज्य सरकारमध्ये सध्या नीलेश लंके हे आमदार देखील नाहीत!

जैन मारवाडी ठेकेदाराचा सुपा परिसरातील खून कोणी- कसा दडपला?
पारनेर तालुयातील कडूस येथील मारवाडी समाजातील एक तरुण इंजिनिअर होता. परिसरात ठेकेदारी करुन तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असायचा! सुपा परिसरात ठेकेदारी करणारा हा मारवाडी समाजाचा तरुण काहींना अडसर ठरु लागला. त्यातून त्या होतकरू ठेकेदाराची निघृण हत्या करण्यात आली आणि पुणे- नगर रस्त्यावरील नारायणगव्हाण येथील विहीरीत त्याचा मृतदेह टाकण्यात आला. खुनाच्या या घटनेचे पडसाद नगर- पुण्यात उमटले. पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. अत्यंत क्रृरपद्धतीने हा खून करण्यात आला असतानाही यातील खुन्यांचा पोलिसांना शोध लावता आला नाही. मारेकरी शोधावे असे पोलिसांना वाटले नाही की मारेकरी शोधू नये अशा सुचना त्यावेळी कोणी दिल्या याचा शोध घेण्याची गरज आहे. पद्धतशिरपणे हा खून दडपण्यात आला असला तरी त्याचे पडसाद आजही नगर शहरासह सुपा- शिरुर भागात आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित झालेले काही प्रश्न!

1 पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांना मानसिक त्रास देतानाच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त कोणी केलं?

2 जिल्हा गौणखनिज अधिकारी असलेल्या अधिकार्‍याला देशात नावाजलेल्या कोविड सेंटरमधील एका बंद खोलीत कोंडून वाळू तस्कराच्या साथीने मारहाण कोणी केली?

3 पारनेर येथील आरोग्य कर्मचारी राहुल पाटील याला मारहाण झाल्याची घटना खरी की खोटी आणि त्याचे कारण काय?

4 महिलांचा सन्मान आणि नारीशक्तीच्या सन्मानाच्या बाता मारताना दुसरीकडे पारनेर ग्रामीण रुग्णालयातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी असणार्‍या उंदरे आणि अडसूळ या दोन महिला डॉक्टरांना शिवराळ भाषेत शिवीगाळ आणि हात उचलण्यापर्यंत मजल याच ‘गरीब’ चेहर्‍याची कशी गेली?

5विधानसभा निवडणुक प्रचार कालावधीत पठारे कुटुंबातील एका डॉक्टरला संपवून टाकण्याची धमकी कोणी दिली?
(सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले हे प्रश्न प्रातिनिधीक आहेत, त्याचा कोणाशी थेट संबंध येत असल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

पुणे / नगर सह्याद्री : राज्यभरातील थंडी आता गायब झाल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांत...

तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

परभणी / नगर सह्याद्री - परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या...

महागाईपासून दिलासा नाहीच! रेपो रेट जैसे थे, EMI वर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - (RBI REPO Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या...

तिसर्‍यांदा देवेंद्र पर्व ; काय काय घडलं पहा

एकनाथ शिंदे, अजित पवार नवे उपमुख्यमंत्री / आझाद मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न  मुंबई | नगर...