spot_img
आर्थिकTips and Tricks: एका मेसेंजमुळे बँक खाते खाली! फसवणूकीच्या प्रकारामुळे Google ची...

Tips and Tricks: एका मेसेंजमुळे बँक खाते खाली! फसवणूकीच्या प्रकारामुळे Google ची ‘नवी’ सेटिंग, एकदा पहाच..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
Tips and Tricks: भारतात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरत आहेत. एका मेसेंजमुळे बँक खाते खाली होण्याचा धक्कादायक प्रकार घडू शकतो त्यामुळे आपण वेळीच सावध राहणे फायदेशीर ठरेल. त्यासाठी Google ने ‘नवी’ सेटिंग उपलब्ध करून दिली आहे.

सायबर गुन्हेगारी ही जगातील सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून उदयास आली आहे. अनेक समस्येचा मुकाबला करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात सर्वच स्तरावर नागरिकांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून सायबर फसवणुकीच्या प्रकारांनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.

एका मेसेंजमुळेही फसवणूकीचा प्रकार गडू शकतो त्यामुळे तुम्हाला गुगल मेसेज अॅपमध्ये स्पॅम प्रोटेक्शन फीचर सक्रिय करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला स्पॅम मेसेज मिळणार नाहीत. हे वैशिष्ट्य सक्रिय केल्याने, तुमचे डिव्हाइस पूर्णपणे सुरक्षित होईल आणि तुमचे बँकिंग तपशील लीक होणार नाहीत.

‘स्पॅम प्रोटेक्शन’

तुमच्या Android स्मार्टफोनवर, Google Messages अॅप उघडा. वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमचा प्रोफाईल फोटोवर टॅप करा.‘सेटिंग्ज’ वर टॅप करा. ‘स्पॅम प्रोटेक्शन’ वर टॅप करा. ‘स्पॅम प्रोटेक्शन चालू करा’ वर टॅप करा. ‘स्पॅम प्रोटेक्शन नंबर सेंटर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊन स्पॅम मेसेज ओळखते. एकदा स्पॅम मेसेज ओळखल्यानंतर, Google स्पॅम फिल्टर वैशिष्ट्य सक्रिय करते त्यामुळे तुमच्या डिव्हाइसवर येणारे स्पॅम मेसेज थांबले जातात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...