spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ ! मंत्री विखे पाटील यांनी साधला...

Ahmadnagar Politics: तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ ! मंत्री विखे पाटील यांनी साधला ‘यांच्या’ वर निशाणा

spot_img

कोपरगाव। नगर सहयाद्री-

आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. कोपरगावकरांनी तळ्यातील गाळ काढला आहे. आता कोपरगाव तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ आलेली असून आता त्याची सुरवातच करण्यात आले असल्याचे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

कोपरगाव शहरातील रिद्धी सिद्धी नगरमध्ये नागरीकांच्या वतीने सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये महाविजेत्या ठरलेल्या गौरी पगारे हिचा नागरी सत्कार महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी आ.आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे महानंदाचे चेअरमन राजेश परजणे पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. रोजगारीचा दर मागील 50 वर्षापेक्षा जास्त आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांनी राजकारणी सोडून विकासाचे मंथन होणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यात कोण कुठं चालले आहे याची उत्सुकता जास्त असून ते सोडून शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा होणे गरजेचे आहे.

एमआयडीसी आणण्यात आपण मागे का राहिलो याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे. मात्र आता आम्ही मंजूर केलेली एमआयडीसी ही राज्यातील अव्वल असेल. तसेच देशात एकच गॅरेंटी आहे. ती म्हणजे पंतप्रदान नरेंद्र मोदी. मात्र येथील काही लोक डळमळीत झाले आहे. ते दुसर्‍याच्या नादी लागलं आहे. चिंता करू नये. आता आपल्या सोबत महायुतीचा आमदार आशुतोष काळे आहेत आणि त्यांना माझी गॅरेंटी असल्याचेही विखे म्हणाले.

मंत्री विखे पाटील यांनी घेतली गौरी पगारेच्या शिक्षणाची जबाबदारी

मंत्री विखे पाटील यांनी गौरी पगारे आणि तिच्या मातोश्री अलका पगारे यांचे अभिनंदन करून वैयक्तिक संवाद साधला आणि पुढे काय करयाचे ठरवले आहे आशी विचारणा केली. तुला आमच्या संस्थेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली तर येण्याची तयारी आहे का या विखे पाटील यांच्या प्रश्नाला गौरी हिने सकारात्मक प्रतिसाद देवून लगेच होकारही दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...