spot_img
ब्रेकिंगसकाळच्या चहा सोबत पार्ले-जी! पार्ले ग्लुको ते पार्ले-जी 'असा' आहे प्रवास

सकाळच्या चहा सोबत पार्ले-जी! पार्ले ग्लुको ते पार्ले-जी ‘असा’ आहे प्रवास

spot_img

नगर सहयाद्री टीम-

सकाळच्या चहा सोबतअनेकांची आवडच बनलेला आहे पार्ले-जी. भारतात क्वचितच असा कोणताही बालक, वृद्ध किंवा तरुण असेल ज्याने आयुष्यात एकदाही पार्ले-जी खाल्ले नसेल. पॅकेज्ड फूड इंडस्ट्रीतील हे कदाचित एकमेव उत्पादन आहे ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळाले आहे आणि ते प्रेम आणि नाते आजही कायम आहे.

पार्ले ग्लुको ते पार्ले-जी असा प्रवास

पार्ले यांनी 1938 मध्ये बिस्किटे बनवण्यास सुरुवात केली आणि त्यांचे पहिले बिस्किट हे साधे ग्लुकोज बिस्किट होते. जे आज आपण पार्ले-जी म्हणून ओळखतो. पूर्वी पार्ले ग्लुको या नावाने ओळखले जात होते. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ते 1985 मध्ये पार्ले-जीमध्ये बदलले गेले. या नावातील ‘जी’ चा अर्थ ग्लुकोज असा होता पण नंतर एका ब्रँड मोहिमेअंतर्गत हा ‘जी’ बदलून जीनियस करण्यात आला.

कुठे होता पहिला पार्ले कारखाना?

आज पार्ले ब्रँड ही हजारो कोटींची कंपनी बनली असेल, पण त्याची सुरुवात या ग्लुकोज बिस्किटापासून झाली आणि त्या बिस्किटामुळे ही कंपनी इथपर्यंत पोहोचली आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जी सुरू झाले. पार्ले-जीचे संस्थापक मोहनलाल दयाल यांनी 1929 मध्ये मुंबईतील विले-पार्ले परिसरात पहिला पार्ले कारखाना सुरू केला. कंपनीची सुरुवात फक्त 12 कर्मचाऱ्यांनी झाली होती, जी आज 50,500 पर्यंत वाढली आहे. पार्ले कंपनीने सुरुवातीला फक्त केशरी कँडी बनवली, त्यानंतर त्यांनी इतर टॉफी आणि कँडी बनवायला सुरुवात केली.

बिस्किटांबरोबरच लोकप्रिय झाले मुलीचे चित्र

पार्ले-जी बिस्किटांबरोबरच आणखी काही लोकप्रिय झाले असेल तर ते त्याच्या पॅकेटवर छापलेले मुलीचे चित्र. सुरुवातीला, त्याच्या पॅकेटवर फक्त उत्पादनाचे नाव असायचे आणि त्याच्या प्रिंट जाहिरातींमध्ये लहान केस असलेली मुलगी दिसायची. मग काही वेळाने बॉब-कट असलेल्या गुबगुबीत मुलीचे चित्र त्याच्या पॅकेटवर छापले जाऊ लागले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....