spot_img
अहमदनगरAhmednagar : 'मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ'

Ahmednagar : ‘मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील पाणी व ओढे, नाले, कॅनल आटल्याने मेंढपाळांनी आपला मुक्काम हलविलेला आहे. पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपले मेंढ्या त्यांचे कोकरे, कुटुंबाचे सदस्यांचे जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या, त्यांची लहान मुलं घोड्यांच्या पाठीवर बसून चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे जेवण पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात. परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागले आहे.

दरम्यान सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घराच्यांना विसरून चारा पाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु कुटुंबीयांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा माणूस घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लादुन ते शेकडो मैलाच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

यावर्षीचे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता राणावाणांमध्ये साजरा करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. चालू वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासूनच पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला. तसेच मेंढ्यांच्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाणी व चारा उपलब्ध आहे. त्या भागाकडे मेंढपाळ कुटुंबीयांनी आपला मोर्चा वळविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ
पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे, कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात चारा व पाणी उपलब्ध आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागत आहे. पाळीव जनावरांनाही सध्या पाणी व चारा टंचाई भासत आहे. आम्ही दरवर्षी श्रीगोंदा तालुक्यामध्ये चारणीसाठी येत असतो परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने परिसरात पाणी नसल्याने आम्ही आमचा मुक्काम दुसर्‍या ठिकाणी हलवला आहे.
– धोंडीबा सरक (मेंढपाळ)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...