मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. काल राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या रिमझीम धारा बरसल्या आहे. पुण्या-मुबंई सह राज्यातील काही भागात पुढील २४ तासांत रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टामुळे अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामळे काही भागातून थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाली आहे.अशातच पुढील २४ तासात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी व रायगडमध्ये दोन दिवस हलका पाऊस पडू शकतो. तर धुळे, नंदुरबार येथेही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.