spot_img
देशट्रॅक्टर-कारच्या भीषण अपघातात तीन शिक्षकांचा मृत्यू

ट्रॅक्टर-कारच्या भीषण अपघातात तीन शिक्षकांचा मृत्यू

spot_img

औसा / नगरसह्याद्री :
अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेक अपघाताच्या मालिका वारंवार समोर येत आहेत. आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे.

भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने कार चालकासह तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना औसा तालुक्यात घडली आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री १२:५० वाजता औशाजवळील साईप्रसाद हॉटेलसमोर घडला आहे.

अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन ३० फुटावर जावून पडले. पोलिस, रुग्णवाहिका आरोग्य कर्मचारी व नागरिकांना कारमधून पहाटे ४:३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. औसा ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मयत शिक्षकांमध्ये महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे तर चालक राजेसाब नन्हु बागवान यांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; पहा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे ७ निर्णय...

बीड पुन्हा हादरलं! ग्रामपंचायत सदस्याला संपवल, कोयत्याने सपासप वार

Beed Crime: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अवघे काही महिनेच उलटले...

मनपाची ‌‘टांग‌’ अन्‌‍ बसस्थानकाला ‌‘मुडदूस‌’

माळीवाडा बसस्थानकाची व्यथा; मनपा ‌‘ढिम्म‌’| माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केला संताप व्यक्त अहिल्यानगर ।नगर...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ‘तो’ निर्णय भोवला; कुस्ती पंच तीन वर्षांसाठी निलंबित

अहिल्यानगरमधील 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त निर्णय | राज्य कुस्तीगीर संघाची कारवाई पुणे...