जामखेड । नगर सहयाद्री
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लुटमार करणाऱ्या टोळीतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सोन्या शिवाजी काळे, अभित्या शिवाजी काळे दोघे (रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर ), शुभम रामचंद्र पवार (रा. सरदवाडी, ता.जामखेड) अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले.सदरची घटना बुधवार दि (१४ मे) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी राजेंद्र दिलीप मैड ( रा आश्वी खुर्द ता. संगमनेर ) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फीर्याद दिली होती.
त्यानुसार टोळीतील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पथकाला सदरचा गुन्हा विकास काज्या काळे, जरेणी विकास काळे, वनिता रामचंद्र पवार, सोन्या शिवाजी काळे,अशांनी त्यांचे साथीदारासह केला असून ते जवळा, ता.जामखेड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचत सोन्या शिवाजी काळे, अभित्या शिवाजी काळे, शुभम रामचंद्र पवार अशांना ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता सदरचा गुन्हा विकास काज्या काळे, जरेणी विकास काळे, लालासाहेब काज्या काळे, किरण काज्या काळे (फरार), वनिता रामचंद्र पवार, दिक्षा रामचंद्र पवार, सुनिल शिवाजी काळे,,रेश्मा सुनिल काळे (सर्व आरोपी फरार) यांच्या साथीने केला असल्याची कबुली दिली. ताब्यातील आरोपीस तपासकामी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, मनोज लातुरकर, सुनिल मालणकर,मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरूण मोरे यांनी बजावली आहे.