spot_img
अहमदनगर'तसले' फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर 'अत्याचार'

‘तसले’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर ‘अत्याचार’

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मैत्रीच्या जाळ्यात ओढत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रण करत त्याआधारे वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पदमाकर दरंदले ( वय-37 वर्षे, रा- कॉलेज रोड, सोनई ) असे आरोपीचे नाव आहे.

30 वषय तरुणी अहिल्यानगर शहरात कटूंबासह वास्तव्यास आहे. फिर्यादी तरुणीच्या लग्नासाठी राहुल दरंदले यांचे स्थळ आले. पाहणीचा कार्यक्रम देखील पार पडला. त्यानंतर नातेवाईकांकडे माहिती घेतली असता राहुलचे दोन लग्न झाले असल्याबाबत समजले. त्यानंतर लग्नासाठी नकार देण्यात आला. दरम्यान राहुलने फिर्यादी तरुणीचा मोबाईल नंबर मिळविला.

मैत्रीच्या जाळ्यात ओढले. मला तुझाशी लग्न करायचे असून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून जबरदस्तीने राहत्या घरात अत्याचार करत त्याचे चित्रण केले. त्यानंतर नेहमी फोटो व्हायरल करत पैशाची मागणी केली तसेच 2021 ते 24 डिसेंबर दरम्यान वारंवार विविध ठिकाणी अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...