spot_img
अहमदनगरखासदार विखेंना धमकी! महायुतीचे शिष्टमंडळ आक्रमक, केली 'मोठी' मागणी? पहा कोण काय...

खासदार विखेंना धमकी! महायुतीचे शिष्टमंडळ आक्रमक, केली ‘मोठी’ मागणी? पहा कोण काय म्हणाले..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी. तसेच खा. डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारीत झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, आ. संग्राम जगताप, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विठ्ठलराव लंघे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सचिन पारखी, विश्वनाथ कोरडे, विनायक देशमुख, बाबुशेठ टायरवाले, विक्रमसिंह पाचपुते, शिवसेनेचे अनिल शिंदे, यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिष्टमंडळाने या घटनेचे गांभीर्य अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकसभा निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली असताना उमेदवारावा धमकावण्याची बाब अतिशय गंभीर आणि अचारसंहीता नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची बाब जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. धमकी देणारा व्यक्ति कोणाचा समर्थक आहे, त्याला कोणाचे पाठबळ आहे. या बाबी उघड होणे अत्यंत गरजेचे आहे. ध्वनिफीतीच्या आधारे संबंधित व्यक्तिचे कॉल डिटेल्स टॉवर लोकेशन तपासून कायदेशार कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे.
महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मतदार आणि उमेदवारांना जाणीवपुर्वक धमकावण्याचे प्रकार महाविकास आघाडी कडून सुरू झाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

दरम्यान या प्रकारानंतर निवृती गाडगे यांनी व्हीडीओ प्रसारीत करून मांडलेल्या भूमिके विरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले. गाडगे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. याबाबत त्यांनी विरोधी उमेदवारा समवेत असलेले गाडगे यांचे फोटो तसेच खा. विखे यांच्या विरोधात समाज माध्यमात केलेल्या टिकात्मक प्रतिक्रीयेचे पुरावेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुपूर्त केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...