spot_img
अहमदनगर'जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे', आ. थोरात यांनी घेतली खा.लंके...

‘जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे’, आ. थोरात यांनी घेतली खा.लंके यांची भेट

spot_img

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात | सलाईन घेत खा.लंके यांचे उपोषण सुरू

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
त्रास होईल म्हणून लोक बोलत नाही. आता लोक बोलत आहे. जे चुकीचे वागले आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.खासदार नीलेश लंके यांनी अहमदनगर पोलिस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भष्ट्रचाराविरोधात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. योवळी खा.लंके यांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी केली.

दरम्यान खा.लंके यांना अशक्तपणा जाणावत असल्याने उपोषण स्थळी थेट सलाईन लावण्यात आले आहे. जो दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका खा.लंके यांनी घेतली आहे. दरम्यान बुधवारी रात्री आ.प्राजक्त तनपुरे यांनी खा.लंके यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधत लंके यांनी पोलिसांचे रेट कार्ड जाहीर केले.

यावेळी बोलतांना थोरात म्हणाले की, लोकांच्या प्रश्नाला खासदार लंके यांनी हात घातला आहे. लोकांना अनेक वेळा त्रास होतो. म्हणून बोलत नाही. कारण अजून त्रास होईल या भिंतीने. जे चुकींचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. याबाबत मी नाशिकचे आयजी यांंच्या सोबत चर्चा केली. त्यांना सर्व परिस्थिती ही सांंगितली आहे. याबाबत मला चर्चा करण्याची गरज वाटते. त्यामुळे याप्रकरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच आयजी हे पोलिस प्रशसनातील एक प्रमुख अधिकारी आहे. वास्तविक पाहता त्यांनी देखील याप्रकारांकडे लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...