अहमदनगर। नगर
शाळेच्या आवारात थांबण्यास विरोध केल्याच्या रागातून तरूणाने महिला सरपंचासोबत हुज्जत घालून गैरवर्तन केले. पतीसह दोघांना मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि. १८) नगर तालुयातील एका गावात घडली.
या प्रकरणी पीडित महिला सरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अविष्कार पेत्रस जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत फिर्यादीचे पती, दीर व चुलत दीर जखमी झाले आहेत.
गुरूवारी सकाळी अविष्कार गावातील शाळेच्या परिसरात होता. तेव्हा फिर्यादीचे पती त्याला म्हणाले, तुझ्यामुळे शाळेचे नाव खराब होते, मुला-मुलींना त्रास होतो.
पुतण्याला घेऊन फिरतो म्हणून शाळेचे नुकसान होते. पुतण्याला घेऊन फिरू नको, शाळेच्या आवारात थांबू नको.’ याचा राग आल्यो अविष्कारने फिर्यादीसोबत हुज्जत घालून गैरवर्तन केले. फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. दीर व चुलत दीर यांना दगड, विटाने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.