spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! अहमदनगरमध्ये चोरट्यांचा 'सुळसुळाट'

खळबळजनक! अहमदनगरमध्ये चोरट्यांचा ‘सुळसुळाट’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुयासह श्रीगोंदा शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर येथे दिनांक २५ जुुन रोजी रोजी पहाटे ४:२० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी २ लाख ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रक्कम लंपास केले.

शिवाजीनगर मधील संभाजीराजे रामचंद्र पवार यांच्या राहत्या घराचे खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील लोकर मधील ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले.तसेच आढळगाव येथे २४जून रोजी रात्री आठ ते सकाळी सहाच्या दरम्यान चोरट्यांनी २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १९ हजार रुपये लंपास केले.

दगडाबाई विनायक कांगुणे यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केले. तसेच मढेवडगाव येथे २३ जून रोजी रात्री ३:४० च्या सुमारास इन्डस मोबाईल टावरचे कार्ड केबल आदी १५ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.

या घटना मुळे श्रीगोंदा तालुयात खळबळ उडाली आहे तिन्ही घटनांची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस कॉन्स्टेबल करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...