spot_img
महाराष्ट्र'ते' दोघे पोलीस ठाण्यात बसलेले, भाजपचे आमदार केबिनमध्ये घुसले अन बेछूट गोळीबार...

‘ते’ दोघे पोलीस ठाण्यात बसलेले, भाजपचे आमदार केबिनमध्ये घुसले अन बेछूट गोळीबार केला..थरारक फुटेज समोर

spot_img

उल्हासनगर / नगर सह्याद्री : भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाडयांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकाच्या केबिनमध्येच हा गोळीबाराचा थरार झाला.

या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये गायकवाड हे केबिनमध्ये जात बेछूट गोळीबार करताना दिसत होते. उल्हासनगरच्या द्वारली येथील जमिनीवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात शीतयुद्ध सुरु होते.

या वादग्रस्त जागेवर महेश गायकवाड यांनी कब्जा केला होता असा आरोप आहे. त्याचबाबत गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले होते. तिथे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हेदेखील पोहचले. हिललाईन पोलीस निरिक्षकांच्या केबिनमध्ये दोन्ही गटाचे प्रमुख लोक बसले होते. पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी होती. त्यात काही वाद झाल्याने पोलीस निरिक्षक उठून बाहेर गेले.

तितक्यात आमदार गणपत गायकवाड यांनी दुसऱ्या दरवाजाने प्रवेश घेतला. त्यावेळी महेश गायकवाड, राहुल पाटील यांचे लक्ष नसताना अचानक त्यांच्यावर गायकवाड यांच्याकडून गोळीबार सुरू झाला. राहुल पाटील यांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्यात राहुल पाटील यांच्या हाताला, खांद्याला गोळी लागली. मात्र गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. पोलिसांनी धाडसाने आमदार गणपत गायकवाड यांना रोखून तात्काळ ताब्यात घेतले. तर महेश गायकवाड, राहुल पाटील या दोन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...