spot_img
ब्रेकिंग..त्यांना अधिकार नाहीच! खासदर राऊत म्हणाले, लोकसभेच्या 'इतक्या' जागा लढविणार

..त्यांना अधिकार नाहीच! खासदर राऊत म्हणाले, लोकसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविणार

spot_img

लोकसभेच्या २३ जागा लढविणार, चर्चा दिल्लीतच करणार

नवी दिल्ली | नगर सह्याद्री

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘उबाठा’ २३ जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला कल्पना दिली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना निर्णयाचे काहीच अधिकार नसल्याने जागावाटपाची चर्चा दिल्लीत झालेलीच बरी, अशीही टिपणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत खा. राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या हवाल्याने काँग्रेस पक्ष लोकसभेला २५ जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. ही बातमी कोणी दिली, मला माहिती नाही. काँग्रेस पक्षाने खुशाल महाराष्ट्रात सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवावी. पण काल आम्ही दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बसलो होतो. हे बहुतेक महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना माहिती नसेल. तेव्हा आमच्यात काय चर्चा झाली, हे आम्हालाच माहिती आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी ते, आदित्य ठाकरे आणि मी यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल यांच्याशी तब्बल अर्धा तास महाराष्ट्राबाबत चर्चा केली. बैठकीत काय घडलं, हे आम्हालाच माहिती आहे.

खा. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कोणताही एक नेता नाही, असला तरी त्याला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. निर्णय घेण्यासाठी त्याला दिल्लीत विचारावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत हायकमांडसमोर होईल. आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितले आहे की, शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवेल. हा शिवसेनेचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा आकडा आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल या दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी आमचे मधूर संबंध आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ते महाविकास आघाडीचे घटक असावेत, असे आम्हाला वाटते. त्याबाबतही दिल्लीत चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्यामुळे जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा केलेलीच बरी ठरेल. जागावाटप जवळपास ठरलेले आहे. अंतिम जागावाटप
आम्ही दोन तासांत पूर्ण करु.

तो निर्णय हायकमांडच घेणार: वडेट्टीवार
संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य करताच काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. कोण किती जागा लढणार, हा वादाचा विषय होऊ शकत नाही. ज्याची जिथे ताकद आहे, तो पक्ष ती जागा लढवेल. हा निर्णय हायकमांडच घेणार आहे. जागावाटपासाठी अद्याप प्राथमिक चर्चेची फेरीही झालेली नाही. त्यामुळे संख्येचा प्रश्न आला कुठे? काहीतरी वावड्या उठवून आपसांत भांडण लावायचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...