spot_img
ब्रेकिंगPolitics News:राजकीय भूकंप होणार!! भाजपाच्या 'बड्या' नेत्यांचा दावा काय? पहा..

Politics News:राजकीय भूकंप होणार!! भाजपाच्या ‘बड्या’ नेत्यांचा दावा काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
येत्या पंधरा ते वीस दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीच्या आधी राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. कुठल्या पक्षात काय होईल, ते कळेलच. पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा राजकीय भूकंप होईल. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक पक्षातले अनेक नेते इच्छूक आहेत, असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाजन यांच्या वक्तव्यावर उबाठा नेते खा. संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, भूकंप व्हायला हा महाराष्ट्र आहे, जपान नाही. जेव्हा २०२४ मध्ये खर्‍या अर्थाने भूकंप येईल, तेव्हा हे सगळे वाहून जातील. ईडीच्या भीतीने पक्ष फोडणे याला भूकंप म्हणत नाहीत.

विरोधकांवर धाडी घालणे, त्यांना तुरुंगात पाठवणे याला भूकंप नाही तर डरपोकपणा म्हणतात. दरम्यान, २०१९ मध्ये ज्या पद्धतीने भाजपकडे मेगाभरती झाली होती; तशीच भरती आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी होईल, असे सांगितले जात आहे. या संदर्भात भाजप नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे...

रजनीकांत 24 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये धमाका करणार ! ‘या’ सिनेमात झळकणार

मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री जया प्रदा का आहे फरार? नेमक्या कोणत्या प्रकरणात अडकल्यात? पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी...

अहमदनगरमध्ये २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार, पालकमंत्री व‍िखे यांचे मोठे सूतोवाच

अहमदनगर / नगर सह्याद्री : औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड...