spot_img
महाराष्ट्रMaharashtra Politics News : .. तर भुजबळांनी राजीनामा द्यावा; मंत्री राधाकृष्ण विखे...

Maharashtra Politics News : .. तर भुजबळांनी राजीनामा द्यावा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले?

spot_img

Maharashtra Politics News : कोल्हापूर | नगर सह्याद्री – ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील [Maharashtra Politics News] यांनी मांडले. कोल्हापूरमध्ये असताना ते पत्रकारांशी बोलत होते. विखे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात वादळ निर्माण होत आहेत, असा नाराजीचा सूर लावला होता.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भुजबळ घणाघाती टीका करताना दिसत आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आता त्यांना घरचा आहेर दिला आहे.

मंत्रिमंडळातीलच नेते असे वक्तव्य करत असतील तर सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा संदेश नागरिकांमध्ये जातो. सरकारबाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही विखे पाटील म्हणाले.

ओबीसींच्या हक्कांचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे. याची काहीच गरज नव्हती. विनाकारण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत. नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले
काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानानं आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...