spot_img
ब्रेकिंग'त्यांची' नियत चुकीची! राहुल गांधींचं कोल्हापुरात धडाकेबाज भाषण; भाजपावर घणाघात, नेमकं काय...

‘त्यांची’ नियत चुकीची! राहुल गांधींचं कोल्हापुरात धडाकेबाज भाषण; भाजपावर घणाघात, नेमकं काय म्हणाले? वाचा..

spot_img

Politics News: सर्वांना सोबत घेऊन जायचंय, अन्याय करायचा नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला दिला. शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आज कोणतं प्रतिक असेल तर ते संविधान आहे. असं सांगत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर घणाघात केला. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही पुतळ्याचं अनावरण केले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही. जेव्हा आपण छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करतो तेव्हा एक वचनही घेतो, ज्याच्यासाठी ते लढले, त्यांच्या इतके नाही परंतु थोडं आपल्यालाही करायला हवं. जर शिवाजी महाराजांसारखे, शाहू महाराजांसारखे व्यक्ती नसते तर आज संविधान नसते. याचा अर्थ शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान यांचे थेट कनेक्शन आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, नियत कधी लपवू शकत नाही, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला पण काही महिन्यांनी तो कोसळला. त्यांची नियत चुकीची होती. पुतळ्याने ते संकेत दिले. जर तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असाल तर तुम्हाला त्यांच्या विचारधारेचं रक्षण करावे लागेल. त्यामुळे तो पुतळा पडला. कारण त्या लोकांची विचारधारा चुकीची आहे. ते शिवाजी महाराजांसमोर हात जोडतात आणि २४ तास शिवाजी महाराजांच्या विचारांविरोधात काम करतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. राम मंदिराच्या उद्घाटनात, संसदेच्या उद्घाटनात आदिवासी राष्ट्रपतींना जावू दिले नाही.या विचारधारा एकच आहे, विचारधारेत फरक नाही. ही राजकीय लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. संविधानाची आणि घटनेची लढाई आहे. अशी टीकाही राहुल गांधी यांनी भाजपावर केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...