spot_img
ब्रेकिंगआज प्रतीक्षा संपणार!, दहावीचा निकाल; कुठे अन् कसा पाहाल रिझल्ट?

आज प्रतीक्षा संपणार!, दहावीचा निकाल; कुठे अन् कसा पाहाल रिझल्ट?

spot_img

10th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीचे विद्यार्थी देखील निकालाची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. आज निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे. आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाईल. ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहायला मिळणार आहे.

यंदा राज्यातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ११ वाजता शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना आणखी काही वेबसाईटवर हा निकाल पाहयला मिळणार आहे.

या इतर वेबसाईटवर पाहू शकता निकाल –
– digilocker.gov.in

– mahahsscboard.in

– mahresult.nic.in

– msbshse.co.in

– mh-ssc.ac.in

– sscboardpune.in

कसा पाहाल निकाल –
– mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.

– होम पेजवर ‘महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025’ लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर लॉगिन तपशील व्यवस्थित भरा.

– दहावीचा निकाल गुणांसह तुम्हाला पाहायला मिळेल.

– निकाल डाऊनलोड करून ठेवा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

शिर्डी । नगर सहयाद्री शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली...

पश्चिम देवस्थान समितीचा मोठा निर्णय; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ‘या’ ड्रेस कोडला बंदी

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू...

निष्ठावंतांना पुन्हा मिळाली संधी! भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची...

राज्यात नव्या वाळू धोरणास मंजुरी; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आता…’

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली आहे....