spot_img
ब्रेकिंगलोकप्रतिनिधीच्या दहशतीला सुरंग लावणार! कामोठ्यातील मेळाव्यात माजी नगराध्यक्ष औटी पुन्हा बरसले..

लोकप्रतिनिधीच्या दहशतीला सुरंग लावणार! कामोठ्यातील मेळाव्यात माजी नगराध्यक्ष औटी पुन्हा बरसले..

spot_img

नवी मुंबई । नगर सहयाद्री-
सुपा एमआयडीसीतील लोकप्रतिनिधीच्या दहशतीला सुरंग लावणार असून व्हिजन असलेला नेता जनतेला पुन्हा मिळणार असून येणाऱ्या काळात सुजय विखे पाटीलच नेतृत्व करतील,असा विश्वास माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे दि. ७ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

औटी म्हणाले, जनतेला व्हिजन असलेला नेता जनतेला मिळणार आहे. विखे पाटील कुटुंबीयांनी 50 वर्षांपासून जनतेची सेवा केली असून डॉ. सुजय विखे पाटील, ही परंपरा अखंड चालवत आहेत. यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या चौथ्या पिढीला सत्तेत बसविले आहे.

सुपा एमआयडीसीतील लोकप्रतिनिधीच्या दहशतीला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरंग लागणार असून, यामुळे येणाऱ्या काळात स्थलांतरणाला आळा बसणार असून स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पारनेर,अहिल्यानगर, आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी
निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार आहे. असे सांगत त्यांनी येणाऱ्या काळातही फक्त विकासाकामांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...