spot_img
ब्रेकिंगमुदत संपायला आली अन भाजपला जाग आली, काय आहे प्रकरण?

मुदत संपायला आली अन भाजपला जाग आली, काय आहे प्रकरण?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नगरसेवकांची मुदत संपत आल्यानंतर भाजपने दोन दिवसापूर्वी बैठक घेतली. ही बैठक आधीच घ्यायला पाहिजे होती, असे म्हणत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून विरोधी पक्षनेते पद घेण्यास नकार दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार-पाच महिन्यांपूर्वीच याबाबत एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. नगरसेवकांची मुदत संपत आल्यावर भाजपकडून हालचाली झाल्याने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेबाबत इच्छुकांमध्ये नाराजी आहे. जुलै २०२१ मध्ये मनपात महाविकास आघाडीची सत्ता येऊन शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तीनही पक्ष सत्तेत आल्याने भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर भाजपने दावा केला.

भाजप नगरसेवकांच्या मागणीनुसार महापौर रोहिणी शेंडगे यांनी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्तीही केली. तसे अधिकृत पत्र त्यांना देण्यात आले. मात्र, कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच नगरसेवक भैय्या गंधे यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांसह राज्यातील पदाधिकार्‍यांपर्यंत हा वाद पोहचल्याने आजतागायत वाकळे यांनी पदाचा कार्यभार घेतला नाही. या पदावरून वाकळे व गंधे यांच्यातील वाद अखेरपर्यंत कायम राहिले. भाजप नेत्यांनी यापूर्वी अनेकवेळा बैठका घेतल्या. पाच महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्थानिक पातळीवर एकत्र बसून तोडगा काढण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतर पाच महिने बैठकच झाली नाही.

डिसेंबर अखेरीस नगरसेवकांची मुदत संपणार असताना दोन दिवसांपूर्वी भाजपला विरोधी पक्षनेते पदाची आठवण झाली. तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्यात आली. शहर भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तोडगा काढण्यासाठी ही बैठक आधीच व्हायला पाहिजे होती. आता १५-२० दिवसांसाठी पद घेऊन काय उपयोग? असा सवाल करत आता पक्षाने विरोधी पक्षनेते पद घेऊ नये, असे नगरसेवकांनी सांगितले. भाजपने मागणी करू नये, त्यांनी (सत्ताधार्‍यांनी) स्वतःहून पत्र दिले तरी घेऊ नये, असेही काही नगरसेवकांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...