spot_img
ब्रेकिंगइकडे भाजप जिंकला, तिकडे चार लाख कोटींची कमाई

इकडे भाजप जिंकला, तिकडे चार लाख कोटींची कमाई

spot_img

स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे शेअर बाजार उच्चांकावर ः गुंतवणूकदारांत आनंद

मुंबई | नगर सह्याद्री

भाजपच्या तीन राज्यांतील विजयानंतर सोमवारी शेअर बाजारातील व्यापार्‍यांचा उत्साह वाढला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेस आणि निफ्टी त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. बाजाराला मजबूत देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर्स ४ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. बीएसईने बाजार उघडताच १५ मिनिटांत ४ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ४ लाख कोटी रुपयांनी वाढून ३४१.७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. बाजारातील जाणकारांच्या मते ४ राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे बाजारात सकारात्मक दिसून येत आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदाणी समूहाच्या सर्व नऊ सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि अदाणी ग्रीन एनर्जीचे शेअर्स १० टक्क्यांच्या वाढीसह उघडले. एनडीटीव्ही, अदाणी पोर्ट्स, अदाणी विल्मार, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचे शेअर्स वधारत होते.

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात पटेल इंजिनीअरिंग, कामधेनू लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, देवयानी इंटरनॅशनल, एसाइड इंडस्ट्रीज, जिओ फायनान्शियल, गती लिमिटेड, टाटा मोटर्स, युनि पार्ट्स इंडियाचे शेअर्स वधारले. सोमवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये बीएसई सेन्सेस ९५० अंकांनी वाढून ६८४३५ च्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टीने २०६०० ची पातळी ओलांडली होती.

भारतातील तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर दलाल स्ट्रीटने वेग पकडला आणि विक्रमी उच्चांक गाठला आहे. निवडणुकांचे निकाल ही एक मोठी घटना ठरली आहे. बाजाराच्या दृष्टिकोनातून परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त चांगले होते, असेही जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूकदार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....