spot_img
देशटाटांना मिळाला नवीन ‘रतन’, कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

टाटांना मिळाला नवीन ‘रतन’, कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
New Chairman of Tata Trust Noel Tata : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा ट्रस्टची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची आता टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटांच्या निधनानंतर मुंबईत टाटा समुहाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टाटा समुहाच्या दोन सर्वात मोठ्या धर्मादाय संस्था सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या प्रमुखपदी आता नोएल टाटांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोएल टाटा हे याआधी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या संस्थांचा कारभार पाहतील. आधी रतन टाटा हे काम पाहत होते. स्वतः रतन टाटा यांनी या संस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. टाटा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची मोठी भागिदारी आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची तब्बल ६६ टक्के भागिदारी आहे. टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. टाटा ट्रस्ट धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचं काम पाहते.

नोएल टाटा रतन टाटांचे उत्तराधिकारी?
रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांचं नाव सर्वात पुढे होतं. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. नवल टाटांचं पहिलं लग्न सूनी कमिश्रिएट यांच्याशी झालं होतं. सूनी व नवल दाम्पत्याला दोन मुलं होती. रतन व जिमी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी देखील लग्नं केली नाहीत. तर, नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा.

कोण आहेत नोएल टाटा?
नोएल टाटा हे सध्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते टायटन लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष देखील आहेत. याआधी सलग ११ वर्षे ते ट्रेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. ते ट्रेंटचे उपाध्यक्ष असताना ट्रेंटचं केवळ एक स्टोर होतं. त्यानंतर त्यांनी ट्रेंटची ७०० स्टोर उभी केली. ते नेरोलॅक पेंट्स व स्मिथ्सच्या संचालक मंडळावर देखील आहेत. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण धेतलं आहे.

नोएल टाटा यांच्या कार्यकाळात समूह कंपन्यांची मोठी झेप
नोएल टाटा हे टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. ते टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्ष देखील आहेत. ट्रेंट यांच्या कार्यकाळातील यशाची सर्वत्र चर्चा आहे. ट्रेंटचे मार्केट कॅप 2.93 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. नोएल टाटा हे ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल $500 दशलक्ष वरून $3 अब्ज झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...

उद्धव ठाकरे दोन शिलेदारांसह ‘शिवतीर्थवर’; पुन्हा एकदा घेतली राज ठाकरेंची भेट, युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई  । नगर सहयाद्री:- महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...