spot_img
अहमदनगरलोकसभेला 'ब्रेक' घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा 'गिअर' टाकणार

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

spot_img
  1. काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार
    श्रीरामपूर | नगर सहयाद्री:-

    राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. दसरा झाल्यानंतर पुढील आठवड्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून वेगाने तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत देखील इच्छुकांची गर्दी आहे. दरम्यान काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूर मतदारसंघास भाजप सुरुंग लावण्याची तयारी करीत आहे.

नगर जिल्ह्याचे तापलेले राजकारण पाहता श्रीरामपूर मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्ही नेते आघाडी घेत प्रतिष्ठा पणाला लावतील, हे सर्वश्रुत आहे. श्रीरामपूर मतदासंघ काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे. अनेक वर्षांपासून सलग काँग्रेसने विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीकडून आमदार लहू कानडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. तर काँग्रेसकडून हेमंत ओगले हे देखील इच्छुक आहे.

महायुतीकडे इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. मात्र महायुतीमधील कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळणार? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपने देखील मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेकडून माजी खासदार सदाशिव लोखंडे याचे पुत्र प्रशांत लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपकडून नितीन उदमले, नितीन दिनकर इच्छुक आहेत. मात्र श्रीरामपुरातील अनेक राजकीय कट्ट्यांवर उमेदवारी भाजपचे नितीन दिनकर यांनाच मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

भाजपचे नितीन दिनकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याशी देखील घनिष्ठ संबंध आहेत. ते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. श्रीरामपूर मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून व नितीन दिनकर यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील अनके विकासकामे देखील पार पडली आहेत. 100 वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील जमिनीचा प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मार्गी लावत श्रीरामपूर मतदारसंघात भाजपने आपला पाया बळकट केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरमध्ये कॉग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर
विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार
स्व. जयंतराव ससाणे यांच्या योगदानानंतर श्रीरामपूरच्या विकासाची गाडी रेंगाळत चालल्याचे चित्र श्रीरामपूरकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिले आहे. तशी चर्चा देखील मतदारसंघात आहे. त्यामुळे विकासाचे व्हिजन असणारा नेता नागरिकांना हवा. नुकत्याच श्रीरामपूर विधानसभेसाठी इच्छुकांच्या काही मुलाखती एका यू ट्यूब चॅनलवर दाखविण्यात आल्या. या मुलाखतीमध्ये व्हिजन असणारा नेता सर्वांनीच पहिला. त्यामुळे 2014 पासून मतदारसंघाचा सूक्ष्म अभ्यास नितीन दिनकर यांनी केलल्याचे स्पष्ट झाले. मतदारसंघातील रखडलेला पाणी प्रश्न, तरुणांचा नोकरीचा प्रश्न, प्रलंबित घरकुलांचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न एक व्हिजन असणारा नेता सोडवू शकतो आणि नितीन दिनकर यांच्या रूपाने शहराला मिळणार आहे. लोकसभेलाच त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती मात्र लोकसभेवेळी जागा शिवसेनकडे गेल्यामुळे त्यांनी ब्रेक घेतला मात्र आता नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा गेर नक्कीच टाकणार अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

काँग्रेसअंतर्गत वादाचा महायुतीला फायदा?
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शिड येथे पार पडल्या. यावेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या दोन गटाने उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे बैठकीत गोंधळ देखील उडाला होता. काही दिवसांपूवच रस्त्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आमदारांच्या विरोधात अंदोलन देखील करण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे मतदारसंघात काँग्रेसमधील दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीला फायदा होणार आहे.

बोगस मतदारांना लागणार ब्रेक
मतदारसंघात 20 ते 25 हजार मतदारांची नावे दुबार, तिबार असून या मतदारांचा महाविकास आघाडीलाचा फायदा होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडल्यामुळे एकाच मतदाराचे दुसरीकडे नाव असल्यास ते शोधणे सोपे झाले. त्यामुळे दुबार मतदार आता वगळण्यात आले आहेत. त्यामुळे 20 ते 25 हजार बोगस मतदारांना ब्रेक लागणार आहे. याचा फायदा कुठल्या उमेदवाराला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नितीन दिनकर एक संघर्षशील व्यक्तिमत्व
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्य भूमित ज्यांनी जन्म घेतला असे संघर्षशील व्यक्तिमत्त्व असलेले नितीन दिनकर भाजप पक्षाची एकनिष्ठ आहे. सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सर्वांनाच पहावयास मिळते. शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांसाठी त्यांनी राजकीय जीवनात संघर्ष केला आहे. वेळे प्रसंगी त्यांनी आदोलने देखील केली. तालुक्यातील शेतकरी दूध आंदोलनात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पायाला भिंगरी बांधत जनसेवेसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...