spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर! कुणाला मिळाली उमेदवारी कुणाचा पत्ता कट..

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर! कुणाला मिळाली उमेदवारी कुणाचा पत्ता कट..

spot_img

Politics News: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आजच पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होणार? याची चर्चा होती. त्यावरूनही आता पडदा उठला आहे. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हीला अणुशक्ती नगर विधानसभेसाठी तिकीट जाहीर झाले आहे.

तर झिशान सिद्दिकालाही आज पक्षप्रवेश देऊन वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पोर्शे प्रकरणात वादग्रस्त ठरलेले वडगाव-शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांना तिकीट मिळणार का याविषयी चर्चा होती. मात्र, अजित पवारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. याआधी अजित पवारांनी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर दुसरी यादी कधी येणार याविषयी उत्सुकता होता. मधल्या काळात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यानं अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले. त्यानंतर आज त्यांनी दुसरी यादी जाहीर केली आहे.

अजित पवार गटाची दुसरी यादी
इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
अणुशक्तीनगर – सना मलिक
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
शिरुर- ज्ञानेश्वर कटके
लोहा – प्रताप चिखलीकर

नवाब मलिक यांना उमेदवारी नाकारली असून तसेच भाजप नेते आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश असून लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांना अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा दिला होता. पण यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. ते वरुड मुर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...