spot_img
अहमदनगरAhmednagar News : शाळेची घंटा वाजली! कुठे रडारड, कुठे पळापळ; पहिल्या दिवशी...

Ahmednagar News : शाळेची घंटा वाजली! कुठे रडारड, कुठे पळापळ; पहिल्या दिवशी कुठे काय घडलं पहा…

spot_img

शाळांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
अहमदनगर | नगर सह्याद्री
Ahmednagar News : दोन महिन्यांची सुट्टी संपून बुधवारी, शाळेची पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहर्‍यावर पसरलेला आनंद, तर काहींमध्ये असलेली शाळेची भीती, आई-बाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा संमिश्र वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.

उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर शनिवारी शाळेची पहिली घंटा वाजली. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकार्‍यांनी शाळेत पाऊल ठेवणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमवितांना दिसली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाल्या काकांचेही काम सुरू झाले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाल्या काकांची वाट पाहत, सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते. बर्‍याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता.

शहरातील प्रगत विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, समर्थ विद्या मंदिर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, महाराष्ट्र बालक मंदिर, दादा चौधरी, मार्कडेय हायस्कूल शाळेत सरस्वतीच्या फोटोचे वंदन करण्यात आले.शाळेचा परिसर रांगोळी, पताका, फुग्यांच्या सहाय्याने सजविण्यात आला होता. तसेच अनेक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आले.

रमेश फिरोदिया शाळेच्या प्रवेशव्दारावर फुग्यांचे तोरण बांधण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप देखील अनेक ठिकाणी करण्यात येत होते.विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून करण्यात आले. मुलींचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. नगर तालुक्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नगर शहरातील शाळांमधून रांगोळी काढून, गुलाबाचे फुल व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी नवीकोरी पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांना वर्गात बसविण्यासाठी पालकवर्गाला मोठी कसरत करावी लागली.

ग्रामीण भागात प्रवेश उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्याचे स्वागत गावातील तरुणांनी टाळ वाजवत, फुलांचा वर्षाव करत केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्या पुस्तकांची नवलाई दिसून आली.

माळीवाड्यातील सविता रामेश फिरोदिया शाळेच्या गेटवर गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सावेडीतील पाऊलबुद्धे विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वाटप करण्यात आले. मुकुंदनगर येथील सावित्रीबाई उर्दू प्राथमिक कन्या शाळेत पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. निघोज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पहाटे युवकाला रंगेहाथ पकडले; गवसलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- कोतवाली पोलिसांच्या रात्र गस्त पथकाने शुक्रवारी (28 मार्च) पहाटे कारवाई...

लालपरीची सेवा करणाऱ्या वडिलांचे लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचे स्वप्न पुर्ण होणार; कान्हूरपठारचा रोहित शिंदे पीएसआय

कान्हूरपठार । नगर सहयाद्री:- लालपरीची सेवा करणाऱ्या वडिलांचे लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचे स्वप्न कान्हूरपठारच्या...

नगर शहरातील ‘या’ पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार; तरुणासोबत घडलं असं काही…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री एमआयडीसीतील गरवारे चौक येथील भारत पेट्रोल पंपावर सोमवारी (२४ मार्च)...

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात त्यांच्यावर...