spot_img
ब्रेकिंगपाऊस आला.. कांदा झाकला.. तरी पण भिजला..; जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!

पाऊस आला.. कांदा झाकला.. तरी पण भिजला..; जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!

spot_img

सुपा | नगर सह्याद्री
गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवार दि. 20 रोजी पारनेर तालुक्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला असुन अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पाणी आले आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे सुपा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कांदा चाळीत पाणी गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या आठ दिवसापासून पारनेर तालुक्यात पूर्व मोसमी पाऊस पडत असुन यामुळे तालुक्यातील अनेक गावातील ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र शेतात वापसा होत नसल्याने मशागती करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मंगळवारी पारनेर तालुक्यातील बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ओढे नाले वाहते झाले.

कडक ऊन्हाळ्यापासुन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा असल्याने अनेक ठिकाणी पाण्याने तळ गाठला होता. गेल्या दोन तीन दिवसापासुन होत असलेल्या पावसामुळे पाण्याबाबतही दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळ पासुनच मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. दुपारी एक नंतर आकाश झाकुन आले होते व दुपारी दोन नंतर हलक्या स्वरुपात पावसात सुरुवात झाली.

सुरवातीला शांत पडत असलेल्या पावसाने नंतर जोरदार उसळी घेतली. यात अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना पाणी आले. तर छोटे मोठे बंधारे पाण्याने भरले. पावसासह वादळी वाऱ्याने मोठ मोठे झाडे उन्मळून पडली. वादळी पावसाने कांदा व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कांदा काढणी चालु असल्याने राणमाळ कांदा पडलेला आहे तर काही ठिकाणी बळीराजा कांदा साठवण्यासाठी गोळा करत आहे. अशातच जोराचा पाऊस झाल्याने झाकपाक करताना शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती.

कांद्याचे मोठे नुकसान
यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यात कांद्यावी विक्रमी लागवड झाल्याची पहावयास मिळाली. परंतु, सध्या कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 40 टक्के शेतकऱ्याचे कांद्याचे उत्पादन पावसामुळे सडून गेले आहे. कांदा साठवणूक करण्यात आलेल्या चाळीत पाणी शिरल्याने नुकसान झाले. तसेच काढलेला कांदा शेतात वरील बाजूने झाकला असला तरी शेतात खाली साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
गेल्या तीन-चार दिवसांपासून पूर्व मोसमी पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात 14.6 मिलीमिटर पाऊस झाला. भिंगार 30.8, नेप्ती 44.5, सुपा 47.5, वाडेगव्हाण 47.3, श्रीगोंदा 61.3, काष्टी 55.3, मांडवगण 34.3, बेलवंडी 36, पेडगाव 34.8, चिंभळा 87.3, देवदैठण 52, कोळगाव 30.8, लोणी व्यंकनाथ 48, भाणगाव 49.8, आढळगाव 49.8, कर्जत 32.3, कोंभळी 45.3, मिरजगाव 69.5, माही 47.5, कुळधरण 38, खेड 36.3, जामखेड 42.8, अरणगाव मंडलात 84.8 मिलीमिटर पाऊस झाला. तर इतर मंडलातही कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

बळीराजा खरिपाच्या तयारीला
केरळात वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये अंदाजे 27 मे रोजी तर राज्यात जून महिन्यात मान्सून दाखल होणार आहे. तत्पूव गेल्या आठ दिवसापासुन अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. यामुळे खरीप हंगामाची पायभरणी चांगली होत असल्याने बळीराजा सुखावला असुन शेतकरी चारा पिकाच्या तयारीला लागला आहे.

4 दिवस मुसळधार पाऊस
मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात धो धो पाऊस कोसळत आह. पुढील चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहणार आहे. मुंबई हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने स्थानिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 21 मे रोजी कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचा परिमाण महाराष्ट्रात होऊ शकतो. कर्नाटक किनारपट्टीजवळ तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या हवामान अंदाजानुसार, 22 मेपासून कर्नाटक किनारपट्टीवरून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. 25 मेपर्यंत ते आणखी तीव्र होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढवेल. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मॉन्सूनपूर्व मध्यम सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. आयएमडीने यंदा मॉन्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यता आहे. तर 10 तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून तळ कोकणात धडकण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 48 तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...