spot_img
ब्रेकिंगनगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :-
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. काल बुधवारी (दि. २०) रोजी पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात मादी जातीचा साधारणतः अडीच वर्षे वयाचा बिबटया अडकला. गावाजवळील नवीन बांधकाम होत असलेल्या साठवण तलावाच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.

आसपासच्या वाड्यांवर बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ले करत त्यांना ठार केले होते, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर आता हा एक बिबट्या जेरबंद झाला आहे. कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावांच्या संयुक्तरित्या साठवण तलावाचे नवीन बांधकाम सुरू असलेल्या परिसरात ऊस, फळबागा आदी पिकांचे क्षेत्र असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे.

त्यामुळे एकदोन महिन्यांपासून बिबट्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात संचार येथे वाढला होता. एकाच महिन्यामध्ये एकाच जागेवर एकापाठोपाठ चार बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. मादी जातीचा अडीच वर्षे वयाचा पिंजरात अडकलेलया
बिबट्याला माळशेजच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...