spot_img
ब्रेकिंगपाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

पाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

spot_img

निघोज | नगर सह्याद्री:-
निघोज परिसरात बुधवार दि.२५ रोजी दुपार पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने निघोज परिसरातील रामवाडी येथील पूल वाहून गेला आहे. रामवाडी व परिसरातील जनतेला निघोज व परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून राज्य व केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी पुलाचे व रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील रामवाडी, ढवणवाडी, पांढरकरवाडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, निघोज परिसरातील जनतेने खासदार नीलेश लंके यांच्याकडे केली आहे.

गेली वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद माध्यमातून या परिसरातील लोकांना संबंधित गावे व वाड्या वस्त्यावरील संपर्कासाठी रामवाडीसाठी पुल दिला होता. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी थोडीफार डागडुजी करीत या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र बुधवारच्या रात्रंदिवस पडत असलेल्या पावसामुळे तसेच संपर्कात असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याने हा पुल वाहून गेला आहे.

तसेच रस्त्याची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. या परिसरात बागायत शेती मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच रामवाडी ढवणवाडी, पांढरकरवाडी शिववाडी, रसाळवाडी,निघोज या परिसरातील शेतकर्‍यांना जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. यासाठी तातडीने केंद्र व राज्य सरकारने तसेच खासदार नीलेश लंके यांनी अतितातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत पुल व रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...