spot_img
अहमदनगर१५ लाखांची क्षणांत फसवणूक! व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं..

१५ लाखांची क्षणांत फसवणूक! व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
बिटकॉइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नेवासा येथील कापड व्यावसायिकाची १५ लाख दोन हजार ८०० रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुकेश भगवानलाल शिंगी (वय ३२ रा. बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, कडू गल्ली, नेवासा) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

या प्रकरणी त्यांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका टेलिग्राम आयडी धारक व्यक्तीविरोधात फसवणूक, आयटी अ‍ॅट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांना २९ मे २०२४ रोजी त्यांच्या टेलिग्राम आयडीवर एका अनोळखी टेलिग्राम आयडीवरून मेसेज आला. यामध्ये बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे सांगितले होते.

तसेच एक लिंक पाठवली होती व त्या लिंकव्दारे ट्रेडिंग खाते उघडण्यास व दिलेल्या यूपीआय आयडी, बँक खात्यावर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीसाठी पैसे पाठविण्यास सांगितले गेले होते. फिर्यादीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन सांगितल्या प्रमाणे लिंक ओपन करून ट्रेडिंग खाते उघडले. त्या व्यक्तीने पाठविलेल्या यूपीआय आयडी व बँक खात्यावर २९ व ३० मे २०२४ रोजी एकुण १५ लाख दोन हजार ८०० रूपये पाठविले.

दरम्यान, फिर्यादी यांनी संबंधीत व्यक्तीला टेलिग्रामवर मेसेज करून ट्रेडिंगमध्ये झालेला नफा व गुंतवणुकीची रक्कम काढून घेण्यासाठी विचारणा केली असता संबंधीत व्यक्तीने फिर्यादीला सांगितले की, नफा व गुंतवणुक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अजून टास्क पूर्ण करावे लागेल. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीकडे वारंवार संपर्क करून भरलेली रक्कम व ट्रेडिंगमधील टास्क पूर्ण करून झालेला नफा मागितला.

परंतू त्याने फिर्यादीला पैसे दिले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली. दरम्यान, येथील सायबर पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...