spot_img
अहमदनगरशिक्षक विधानपरिषद निवडणूकीबाबत पणन महामंडळचे अध्यक्ष पानसरे यांचे मोठे विधान

शिक्षक विधानपरिषद निवडणूकीबाबत पणन महामंडळचे अध्यक्ष पानसरे यांचे मोठे विधान

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नुकतीच जाहीर झालेली नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे मत विधान महाराष्ट्र राज्य पणन महामंडळचे विद्यमान अध्यक्ष प्रा.दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी केले आहे.

घारगाव ( ता. श्रीगोंदा ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पानसरे यांनी अतिशय लहान वयात आपल्या राजकीय, सामजिक कार्याला सुरुवात केलेली आहे. अकल्पित नेतृत्वगुण, उत्तम प्रतीचे संगठन कौशल्य,धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य, जि.प.सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळालेली आहे.

ह्या पदांवर काम करत असतना अतिशय अभ्यासपूर्वक विविध प्रश्नांची सोडवणूक करून जनतेला न्याय देण्याचे काम केलेले आहे. सन १९९९ पासुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालये अहमदनगर व पुणे जिल्ह्यामध्ये सुरु करून खऱ्या अर्थाने ज्ञानगंगा खेडोपाडी पोहचविण्याचे काम केलेले आहे. त्याअंतर्गत आज राज्यभरातून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असून स्वावलंबी बनून जीवन जगत आहेत.

समाजाला खरी दिशादेणाऱ्या शिक्षक बंधू आणि भगिनींचे वर्षानुवर्षापासून शासन दरबारी अनुदान , पेन्शन ,नियुक्ती, संच मान्यता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, शाळाबाह्य कामकाज असे अनेकविविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागातील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनीं च्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढवत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...