spot_img
अहमदनगरशरद पवार यांचे सर्वात मोठे विधान! रोहित पवार भावी मुख्यमंत्री?, वाचा सविस्तर

शरद पवार यांचे सर्वात मोठे विधान! रोहित पवार भावी मुख्यमंत्री?, वाचा सविस्तर

spot_img

Politics News: “उभं करायला अक्कल लागते, पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही.” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अहमदनगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार यांचा मतदार संघातील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी असले पाहिजे हाच विचार करुन रोहित पवारांनी दोन तालुक्याच्यामध्ये एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्या एमआयडीसीला अडथळा आणण्याचे काम झाले. मी रोहितला सांगितले की, काळजी करु नको दोन महिन्याने चित्र बदलणार आहे. हे काम करण्यासाठी मला तरुणांची साथ हवी आहे. ही ताकद कुणात असेल तर ती रोहित पवारांमध्ये आहे. त्यामुळं तुमची साथ रोहित पवारांना द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

पुढे बोलतांना पवार म्हणाले, कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला हवा होता. कारण यामुळं अनेक लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. पण एमआयडीसी होतेय म्हटल्यावर त्याला विरोध करणे, अडचणी आण्याचे काम सुरु आहे. परंतु दोन महिन्यांनी राज्यातील चित्र बदलणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे.

रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे. तिथे काम करण्याची तुला चांगली संधी आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवली. रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे शरद पवार म्हणाले.

 

रोहित पवार भावी मुख्यमंत्री?; शरद पवारांचे सर्वात मोठे विधान
“मी कधी मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही. रोहितनेही कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही. मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो, पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा, आणि नंतर वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो, एकदा नाही चार वेळा मुख्यमंत्री झालो, असं शरद पवार म्हणाले. रोहितचीही पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, असे सर्वात महत्वाचे विधान शरद पवार यांनी केले. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...