spot_img
ब्रेकिंगमहायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार...

महायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार प्राधान्य..

spot_img

Politics News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचा दौरा करून गेल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते अलर्ट मोडमध्ये गेले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी शनिवारी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. दीड ते दोन तास चाललेल्या बैठकीत जागावाटपावर आणि महायुतीच्या जाहीरनाम्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. जाहीरनाम्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

आगामी निवडणुकीतील अडचणींच्या उपाययोजना आणि तिन्ही पक्षांच्या संभाव्य मताधिक्याबाबत देखील विचारविनिमय झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात या बाबीवर चर्चा झाली होती.

त्यानुसार, भाजप १५० ते १६० जागांवर, शिवसेना ८० ते ९० जागांवर आणि अजित पवार गट ४५ ते ५० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यात कोणतेही बदल होणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीही विधानसभेसाठी जोरदार तयारीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोण गुलाल उधळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...