spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांच्या सभेची परवानगी नाकारली! कारण काय? वाचा सविस्तर

जरांगे पाटलांच्या सभेची परवानगी नाकारली! कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

Maratha Reservation: काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या अडचणीत सतत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्यावर 2024 मध्ये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात दोन दिवसांत पाच गुन्हे जरांगे यांच्यावर बीडमध्ये दाखल झाले आहेत. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत बैठका घेत आहे. अशात परळी वैजिनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मार्च सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीची जनतेला माहिती व्हावी, यासाठी संयोजकांनी परळी शहर आणि संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांकडे ऑटोरिक्षावर ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी 13 मार्च रोजी रीतसर अर्ज केले होते. पोलिसांनी 16 मार्चला काही अटी शर्ती घातल्या. याविरोधात संयोजकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता.

पण, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्यामुळे या याचिकेवरआज सकाळी सुनावणी अपेक्षित आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...