निघोज | नगर सह्याद्री-‘नगर सह्याद्री’ ने ग्रामीण भागाच्या विकासासाठी दहा वर्षांत सर्वाधिक योगदान दिले असून नगर सह्याद्री दिनदर्शिका म्हणजे माहितीची परिपूर्ण दिनदर्शिका असल्याचे गौरवोद्गार शिवतेज मंडळाचे संस्थापक अॅड कृष्णकांत जगदाळे यांनी व्यक्त केले आहे. बाभुळवाडे येथील शिवतेज दरबारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नगर सह्याद्री दिनदर्शिकेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवतेज मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव बोरुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुणशेठ लंके, बाभुळवाडे सोसायटीचे चेअरमन गणपतराव जगदाळे, युवा नेते सचिन जगदाळे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मोरे, सचिव बाबाजी वाघमारे, अॅड. तेजस कवाद, जुबेर पठाण, आप्पासाहेब दाते, शिवतेज उद्योग समूहाच्या कार्याध्यक्षा अंजुम पठाण, सविता खणकर, सुरेखा बोरुडे, रेखा बोरुडे, कल्याणी बोरुडे, उत्कर्ष बोरुडे, शांताबाई बाबुराव जगदाळे, स्वरा कोल्हे आदी मान्यवर तसेच परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अॅड. जगदळे म्हणाले, सारिपाठ माध्यमातून खर्या अर्थाने नगर सह्याद्रीने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भुमिका सातत्याने घेतली म्हणून नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद बसला आहे. शासनाचे प्रशासन जाग्यावर आणण्याचे काम नगर सह्याद्रीने मोठ्या प्रमाणात केल्याने अधिकारी असोत किंवा लोकप्रतिनिधी जमीनीवर पाय ठेऊन जनतेचे काम करतात हा नगर सह्याद्रीचा सर्व सामान्य जनतेला आलेला अनुभव असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद यांनी यावेळी सांगितले की, शिवतेज मंडळाचे संस्थापक अॅड कृष्णकांत जगदाळे तसेच शिवतेज मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव बोरुडे व त्यांच्या सहकार्यांनी गेली वर्षभरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची सामाजिक निती काय होती सर्वसमावेशक नेत्वृत्व कसे असावे हा छत्रपतींच्या इतिहासाचे अनुकरण करण्याचे काम अॅड कृष्णकांत जगदाळे हे करीत आहेत.
बाभुळवाडे व परिसरातील जनतेचे संघटन करीत विकासाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचे काम जगदाळे व त्यांचे सहकारी करीत असल्याचे गौरवोद्गार शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद यांनी व्यक्त केले आहे. यावेळी शिवतेज महिला उद्योग समूहाच्या कार्याध्यक्षा अंजुम पठाण यांनी नगर सह्याद्री दिनदर्शिकेचे कौतुक केले नगर सह्याद्री माध्यमातून महिला बचत गटांना मार्गदर्शन होण्याचे काम होत असून नगर सह्याद्री म्हणजे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करीत असलेले लोकप्रिय दैनिक असल्याचे गौरवोद्गार पठाण यांनी व्यक्त केले आहे.
२०२४ नवीन वर्षाचे स्वागत, नगर सह्याद्री दिनदर्शिका स्वागत, मान्यवरांचा वाढदिवस अशा प्रकारे बाभुळवाडे येथील शिवतेज मंडळाच्या माध्यमातून शिवतेज दरबार येथे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी वाढदिवस मान्यवरांची मिरवणूक, केदारेश्वरची आरती तसेच नगर सह्याद्री दिनदर्शिका स्वागत अशा प्रकारे मोठा उत्सव साजरा करण्यात आला.



 
                                    
