spot_img
महाराष्ट्रतिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

spot_img

परभणी / नगर सह्याद्री –
परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्या प्रकरणामध्ये राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेमागील गूढ अखेर उलगडले. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

परभणीच्या गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेमुळे गंगाखेड हादरले होते. आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी-कद्दू येथील रहिवासी होते. या तिघाच्या आत्महत्येमुळे तुडमे याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. या तिघांच्या मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनासंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लावण्यात आले. याप्रकरणी मसनाजी यांचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (२१, रा परभणी ) या तरुणाविरोधात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

मात्र तपास करताना पोलिसांना आरोपी तरुणाच्या मोबाइल सीडीआरवरून संशय बळावला. चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस आणि कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचे कबूल केले. यावरून ४ डिसेंबरला रात्री गंगाखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...