spot_img
महाराष्ट्रसगे-सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल, अन्यथा.. मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

सगे-सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल, अन्यथा.. मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. जे मराठे लढले, त्यांच्यासाठी हा मागासवर्गीय अहवाल आला. ते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहेत. ज्यांना त्यामधून आरक्षण द्यायचे आहे त्यांनी ते घ्यावे, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणे व त्यांच्यासाठी सगे-सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल, त्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागेल. नाही तर आम्ही कोणालाच सोडणार नाहीत. 20 तारखेपर्यंत काही करून अध्यादेशाची अंमलबजावणी करा. हैदराबाद गॅझेट घ्या. सग्या सोयऱ्यासाठी समितीला एक वर्ष वाढवून द्यावे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. जर दिलेले शब्द पाळले नाही तर २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलेल, 20 तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचे बघावे, मराठा मराठ्यांचे बघतील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मुंबईला गेल्यामुळे फसवणूक नाही तर अंमलबजावणीत फसवणूक
सगळा मराठा कुणबीच आहे. मुंबईला गेल्यामुळे फसवणूक झालेली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झालीय असं तुम्ही म्हणू शकता. कुणीही गोड बोलून मराठ्यांना माघारी पाठवलेलं नाही. समाजाच आणि माझ अतूट नात झाल आहे. मराठ्यांना फसवलं, तर नव्याने लढाई उभारेन, असं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नारायण राणे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी असं बोलणे हे शोभत नाही. अशा मोठ्या नेत्याला आम्ही काही बोलणं हे देखील उचित नाही. आम्ही आजवर त्यांच्यावर कधी बोललेलो नाहीत. परंतु यानंतर जर त्यांनी आमच्यावर टीका केली तर आम्ही त्यांनाही सोडणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...