spot_img
मनोरंजनThe Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' टीव्हीवरून बंद,...

The Kapil Sharma Show : ‘द कपिल शर्मा शो’ टीव्हीवरून बंद, आता कुठे दिसणार? पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम : ‘द कपिल शर्मा शो’ हा प्रचंड गाजलेला शो आहे. परंतु बऱ्याच दिवसांपासून हा शो टीव्हीवरून बंद आहे. त्यामुळे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. The Kapil Sharma Show

पण आता कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. हा शो लवकरच सुरू होणार आहे. पण ट्विस्ट असा आहे की, हा शो आता टीव्हीवर नाही तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असेल. कपिल शर्माने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

प्रोमोमध्ये नेमकं काय सांगितलं आहे ?
या प्रोमोमध्ये कपिल शर्मा आपल्या नवीन घरात जाऊन फ्रीज उघडताना दिसत आहे. कपिल फ्रिज उघडतो आणि म्हणतो, “मी तुला सांगितलं होतं की नव्या घरात जुन्या गोष्टी ठेवू नयेत. फ्रिज उघडताच अर्चना पूरण सिंह त्यात बसलेली दिसली. यानंतर सगळं सामान तुटून जाते. कपिल जेव्हा कामगाराला खवळायला जातो तेव्हा तो राजीव ठाकूर असल्याचे समोर आले.

या व्हिडिओमध्ये किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक देखील दिसत आहेत. मग कपिलचा मॅनेजर म्हणतो की यांनाही हटवू का? तेव्हा कपिल म्हणतो- काही हरकत नाही, घर नवीन आहे, कुटुंब जुने आहे.

कुठे दिसणार हा शो ?
हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रोमोसोबत कपिलने कॅप्शनमध्ये लिहिलं- ‘फक्त घर बदललं आहे, कुटुंब एकच आहे. आता हा शो तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या व्हिडिओवर युजर्स सातत्याने कमेंट करत आहेत. आमच्याकडे नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन नाही, असे काही जण म्हणत आहेत, तर काही जण टीव्हीवर तुम्हाला मिस करणार असल्याचे सांगत आहेत. याचाच अर्थ आता द कपिल शर्मा शो हा टीव्हीवर न दिसता नेटफ्लिक्सवर वर दिसणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...