spot_img
अहमदनगरAhmednagar : निवडणुकीत बायकोचा पराभव झाला, त्यानंतर माजी सरपंचाने जे केलं ते...

Ahmednagar : निवडणुकीत बायकोचा पराभव झाला, त्यानंतर माजी सरपंचाने जे केलं ते त्याने गाव हादरलं

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक नुकत्याच पार पडल्या. त्याचा लगेच निकालही लागला. परंतु अनेक लोक येथे झालेला पराभव जिव्हारी लागून घेतात. त्यातून वेवेगळे कृत्य करतात. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या आपल्या बायकोचा दारुण पराभव झाल्याने निराश झालेल्या एका माजी सरपंचाने रात्री दारू पिऊन विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून शिवीगाळ केली. त्याच झालं असं की, माजी सरपंचाच्या पत्नीने निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

त्यात त्यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या पतीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी रात्री दारू पिऊन विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. सदर शिवीगाळ काही कार्यकर्त्यांच्या घरातील लोकांनी ऐकल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारला. दुसर्‍या दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी संबंधित पॅनलच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि त्यांना निर्वाणीचा इशारा दिला.

पॅनल प्रमुखांनी सुद्धा संबंधित माजी सरपंचाला बोलावून घेऊन त्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे सध्या तरी वातारण शांत झाले आहे. निवडणूक होतच असतात. हार जीत सुरु असते. त्यामुळे हा पराभव खिलाडू वृत्तीने घेतला पाहिजे. परंतु येथे मात्र वेगळेच पाहायला मिळालं. रागाच्याभरात या माजी सरपंचाने विरोधी गटाच्या निवडून आलेल्या सरपंचाच्या कार्यकर्त्यांना अशी घाणेरडी शिवीगाळ करून स्वतःचे हसू करून घेतले आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये याच एकच चर्चा सुरु होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...