spot_img
अहमदनगरघरासह गोठ्याला आगीचा वेढा, आत सर्जा-राजाची जोड, धुमसत्या आगीमुळे शेतकरी कटूंबासोबत घडलं...

घरासह गोठ्याला आगीचा वेढा, आत सर्जा-राजाची जोड, धुमसत्या आगीमुळे शेतकरी कटूंबासोबत घडलं ‘भयंकर’..

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
तालुक्यातील कारेगावातील शेतकरी देवराम जेडगुले यांच्या राहत्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली असून राहत्या घरात संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाल्या आहेत.

अधिक माहीती अशी: कारेगाव येथील शेतकरी देवराम जेडगुले व घरातील सदस्य कामानिमित्त शेतात गेले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास राहत्या घराला व गोठ्याला अचानक आग लागली.

गोठ्यात दोन बैल, चार गाई यांनी मोठमोठ्याने हांबरडा फोडला आगीमुळे त्यात कोणालाच जाता न आल्याने एक बैल गंभीर जखमी होवून मृत्यमुखी पडला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

यावेळी शेतामध्ये गेलेले घरातील सदस्य व गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात आसल्याने प्रयत्न असफल झाले. घरातील सर्व गृहोपयोगी वस्तु, ५० कोंबड्या, दागिने जळुन खाक होऊन शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती कळताच दिपक लंके, माजी सभापती काशिनाथ दाते, नंदकुमार औटी, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी भेट दिली. गावातील महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...