spot_img
ब्रेकिंगराजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, 'त्या' दाव्यांने पुन्हा...

राजकारणात पुन्हा भूकंप होणार? हादरे (शिवसेना) शिंदे गटाला बसणार, ‘त्या’ दाव्यांने पुन्हा ट्विस्ट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले आहेत. महाराष्ट्रचे राजकीय वातावरण तापले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट झालाय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष महायुती म्हणून लढत आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले असून अनेक खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट करण्यात आला आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा कंप होण्याची शक्यता असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी (शिवसेना) शिंदे गटाला हादरे बसणार असा दावाच केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले काय?
काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...

कही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत...