spot_img
राजकारणमोदी-योगींच्या सभा महायुतीला टाळाव्या लागणार; अजित पवार गट ठरणार किंगमेकर!

मोदी-योगींच्या सभा महायुतीला टाळाव्या लागणार; अजित पवार गट ठरणार किंगमेकर!

spot_img

सारीपाट / शिवाजी शिर्के
आतापर्यंत उत्कंठावर्धक निवडणूक झाली नसेल इतकी आत्ता महाराष्ट्रात होताना दिसते. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, योगी आदित्यनाथ अशा नेत्यांच्या दणयात प्रचार सभा झाल्या. मतदारसंघ निहाय आढावा घेतल्यास सभांचा धुराळाच उडाला असल्याचे दिसते. प्रचाराच्या अखेरच्या या आठ दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रामुख्याने राहुल गांधींच्या सभा मुंबई व विदर्भ या दोन विभागांमध्ये जितया अधिक होतील तितका महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. या उलट, मोदी-योगींच्या सभा जितया कमी होतील तितया महायुतीला योग्य ठरेल असे दिसू लागले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी मोदी- योगींच्या सभांऐवजी स्थानिक मुद्दे समोर ठेवत शत प्रतिशत अभियान राबविण्याची गरज आहे.

मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे-पाटील यांनी माघार घेऊन महायुतीला दणका दिला हे भाजपच्या नेत्यांना मान्य करावे लागले आहे. अन्यथा राज्यातील पहिल्या दौर्‍यात ओबीसी एकीकरणासाठी मोदींना घसा कोरडा करावा लागला नसता. ओबीसी एकीकरणासाठी भाजपने राहुल गांधींच्या संविधानाच्या मुद्द्याला हात घातला आहे. लाल वही वगैरे खिल्ली उडवून त्यांनी काँग्रेसच्या हाती कोलीत दिले असे दिसते. खरे तर आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा तितकासा प्रभावी ठरला नव्हता. काँग्रेसकडून हा मुद्दा मांडला जाईल याची भाजपला अपेक्षा होती; पण दलितांची मते पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी संघटनेच्या स्तरावर वेगळे प्रयत्न केले जात होते. त्यामुळे जाहीरपणे संविधानाच्या मुद्द्यावर नुकसान होईल असे भाष्य करण्याची भाजपला गरज नव्हती.

मोदींच्या भाषणांमध्ये अर्बन नक्षलचाही मुद्दा होता. हा मुद्दा राज्यातील डाव्या नागरी संघटनांमध्ये संताप निर्माण करणारा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरी संघटनांच्या प्रयत्नांमुळे एकगठ्ठा मुस्लीम आणि दलित मते महाविकास आघाडीला मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत ही खेळी फारशी यशस्वी होणार नाही असे वाटत होते. पण मोदींच्या भाषणानंतर या नागरी संघटना कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. मुंबईमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेला मोठा फायदा मिळू शकतो. विधानसभा निवडणुकीनंतर इथे महापालिकेची निवडणूक होणार असेल तर मुंबईमध्ये ठाकरेंचा विजय भाजपसाठी नामुष्कीजनक असेल. महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपने शिंदेंना बाजूला करत राज ठाकरे यांच्याशी संधान बांधले आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्षात माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला तर त्याची जबाबदारी भाजप घेणार की शिंदे गट हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना विचारू शकते!

योगींच्या कटेंगे-बटेंगेच्या विधानातून भाजपला पुन्हा हिंदुत्वाची गरज पडली असल्याचे दिसते. पण, यावेळी राज्यात फक्त हिंदुत्वावर जिंकता येणार नाही. ही निवडणूक जातीच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या दैनंदिन समस्यांच्या मुद्द्यांवर लढवली जात असल्याचे आता दिसू लागले आहे. योगींच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे मुस्लीम-दलित एकीकरणाला मदत होऊ शकेल. त्याचा अधिकाधिक लाभ काँग्रेसने घेतला तर मुंबई-विदर्भात महाविकास आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शयता असेल. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने योगींविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणे हा डावपेचाचा भाग झाला. अजित पवार गटाची मते हिंदुत्वाला भुलणारी नाहीत. त्यामुळे योगींच्या कटेंगे-बटेंगेच्या विरोधात बोलणे अजित पवारांना फायदेशीर ठरणार आहे. तसेही भाजपसाठी अजित पवार गट नाइलाजानेच महायुतीत राहिला आहे. हा गट आत्ताही एकप्रकारे स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे भाजपनेत्यांची दुही माजवणारी विधाने अजित पवार गटाच्या पथ्यावर पडू शकतात. वास्तविक सूक्ष्म-नियोजनावर भाजपचा जितका भर राहील तितकी यश मिळण्याची संधी जास्त, हे माहीत असूनही मोदी-योगींना राज्यात आणले जात आहे.

लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा मोठा तोटा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सहन करावा लागला होता. उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी महायुतीला कसे रडवले हे अनुभवलेले आहे. आत्ताही विदर्भात सोयाबीनचे भाव पडले असून शेतकरी सत्ताधार्‍यांवर नाराज झालेला असल्याचे बोलले जाते. भाजपने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी निवडणूक अखेरच्या टप्प्यामध्ये लोकांशी निगडित मुद्द्यांभोवती फिरू लागल्याचे दिसत आहे. मोदींनी सावरकरांवरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पण, त्याकडे काँग्रेसने आणि राहुल गांधींनी दुर्लक्ष केलेले दिसते. उलट, काँग्रेसचे नेते शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलू लागले आहेत. ग्रामीण भागांमध्ये लोकांचेच मुद्दे महत्त्वाचे ठरू लागले आहेत. संविधानाच्या मुद्द्याला भाजपनेच ताकद मिळवून दिली आहे. दुसर्‍या बाजूला, मोदी-शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे घोषित करून टाकले आहे. त्यांचे बोलणे संघटनेसाठी योग्य होते पण, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने उघडपणे कौल दिला आहे.

प्रचाराच्या अखेरच्या या आठ दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रामुख्याने राहुल गांधींच्या सभा मुंबई व विदर्भ या दोन विभागांमध्ये जितया अधिक होतील तितका महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. या उलट, मोदी-योगींच्या सभा जितया कमी होतील तितया महायुतीला योग्य ठरेल असे दिसू लागले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी मोदी- योगींच्या सभांऐवजी स्थानिक मुद्दे समोर ठेवत शत प्रतिशत अभियान राबविण्याची गरज आहे.

पाठीत खंजीर खुपसणारं प्रेम भाजपाने केलं!
बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाजपा एक इंच पुढे जाऊ शकत नाही. तोच पक्ष भाजपाने फोडला, खरेदी केला आणि एकनाथ शिंदेंना विकला. तुमच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेब ठाकरेंबाबत जास्त प्रेम आणि आदर आहे. त्यांचं प्रेम तुमच्यासारखं ढोंगी नाही. पाठीत खंजीर खुपसणारं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवार गट ठरणार किंगमेकर!
निवडणुकीनंतर आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार चालणार नाही. आम्ही आमची कोणतीही विचारधारा सोडलेली नाही. आम्ही आमच्या विचारधारेशी बांधील आहोत. आम्ही आमची विचारधारा कधीही सोडणार नाही. मी वारंवार सांगतो की, अजित पवार किंगमेकर ठरणार आहेत. यापुढे जे काही सरकार निर्माण होईल, त्यामध्ये किमान समान कार्यक्रम ठरेल. चंद्राबाबू नायडू यांच्यासारखी आमची ताकद राहणार आहे असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधनामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आता लग्नपत्रिकेवरही बटोगे तो कटोगेचा नारा!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनात यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ङ्गबटेंगे तो कटेंगेफ असा नारा दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक है तो सेफ है, असा नारा दिला. विरोधकांनी या नार्‍यावर जोरदार टीका केली असली तरी भाजपाकडून मात्र या नार्‍याचा नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा सर्वप्रथम हरियाणाच्या निवडणुकीत देण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये याची पुनरावृत्ती केली जात आहे. आता ही घोषणा फक्त निवडणुकीपुरती मर्यादित राहिली नाही. तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याने यापुढे जाऊन ही घोषणा थेट लग्नपत्रिकेवर टाकली आहे. सदर लग्नपत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र

छत्रपती शिवरायांचं नाव हातोड्याने तोडून आजोबाचं नाव दिलं! तो कारखाना बंद पाडून बापाच्या नावानं...

विजयाची फुले पवारांना अर्पण करणार ः प्रणोती जगताप

राहुल जगताप यांच्यासाठी काष्टीत प्रचारफेरी श्रीगोंदा | नगर सह्याद्री महाविकास आघाडीच्या तिकिटाचे दावेदार राहुल जगताप हेच...

घराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले पहा…

देवीभोयरे परिसरात प्रचारफेरी पारनेर | नगर सह्याद्री - राजकारण, समाजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, पारनेर विधानसभा...

सेटलमेंट झाली की ते माघार घेतील अन् एकाला पाठींबा देतील!; विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत

श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत...