spot_img
ब्रेकिंगसरकारचे डाव लिहून ठेवलेय! जरांगे पाटील स्पष्टच म्हणाले, समाजाला सांगणार...

सरकारचे डाव लिहून ठेवलेय! जरांगे पाटील स्पष्टच म्हणाले, समाजाला सांगणार…

spot_img

बीड। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरलं आहे. मनोज जरांगे हे उपोषण स्थगित केल्यानंतर पुन्हा दौर्‍यासाठी बाहेर पडले आहेत. मनोज जरांगे सध्या बीड दौर्‍यावरुन असून विविध ठिकाणी जाऊन ते बैठक घेत लोकांशी संवाद साधत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. सरकार रडीचा डाव खेळात आहे. सरकार काय डाव आखत आहे ते मी लिहून ठेवलंय. उद्याच्या (बुधवारी) बैठकीत मी समाजाला सांगणार आहे. काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील असेही मनोज जरांगे म्हणाले.

सगे सोयर्‍यांची अधिसूचना काढण्यात आली आहे. जाणूनबुजून एखाद्या मंत्र्याच्या दबावामुळे तुम्ही हा कायदा करत नाही. पूर्वी एक राजा न्याय द्यायचा आता ३ राजे आहेत तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर लढाई करत आहोत. फक्त आंदोलकांनी आंदोलन शांत करावे, मग तुमच्यावर कसे गुन्हे दाखल करतात कशा नोटिसा देतात ते बघतो. फक्त ११ ते १ या वेळेत रास्ता रोको करा आणि आज संध्याकाळ पासून गावा गावात धरणे आंदोलन करा. उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होणार असून ही निर्णायक बैठक होईल, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मी कुणालाही त्रास देत नाही. अधिसूचना त्यांनी काढली. अंमलबजावणी त्यांनी करायला हवी. पूर्वी राजा न्याय द्यायचा. आताच्या राजांना दया माया नाही. जनता बिथरली तर काय करणार आहे. आता तीन रा६जे आहेत. एक राजा न्याय देत असेल तर दोन राजांनी त्याला साथ द्यावी. यांना गुलालाचा राग आलाय. तुम्ही म्हणता रोगर प्या. याला राजा म्हणतात का? सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे. मला समाज जे म्हणेल ते मी ऐकेन, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना आलेल्या प्रतिबंधमक नोटीसीबाबतही भाष्य केलं. त्या नोटिसा स्विकारल्या तरी काही होणार नाही. रास्ता रोको केला म्हणून गुन्हे दाखल केल्यास मला येऊन सांगा. गृहमंत्री यांचं ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...