spot_img
अहमदनगरराळेगणसिद्धीतील सत्कार सरपंचाना उर्जा देणारा ठरेल : शिवाजी शिर्के

राळेगणसिद्धीतील सत्कार सरपंचाना उर्जा देणारा ठरेल : शिवाजी शिर्के

spot_img

पारनेर, शिरुरच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा मातोश्री लक्ष्मीबाई औटी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

राळेगणसिद्धी | नगर सह्याद्री
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवितानाच त्यांच्या विश्‍वासाला पात्र ठरेल असे काम जनतेतून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी करावे. राळेगणसिद्धीमध्ये होत असलेला लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार तुम्हाला गावात काम करताना उर्जा देणारा ठरेल असा आशावाद अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी व्यक्त केला.

राळेगणसिद्धी येथील मातोश्रीे लक्ष्मीबाई दगडु औटी प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर व शिरुर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. शिर्के बोलत होते. या कार्यक्रमात वाडगव्हाणच्या सरपंच सौ. प्रियंकाताई किशोर यादव, मावळेवाडीच्या सरपंच सौ. कल्याणीताई कांतीलाल भोसले,

देवदैठणच्या सरपंच सौ. जयश्रीताई विश्‍वास गुंजाळ, रामलिंगच्या सरपंच कु. शिल्पा दिलीप गायकवाड, तर्डोबावाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे, यादववाडीचे सरपंच राजेंद्र बाळु शेळके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सौ. सोनालीताई विजय घावटे (रामलिंग), सौ. नंदीनीताई येथू झांबरे (वाडेगव्हाण), सौ. चैतालीताई अमोल यादव (वाडेगव्हाण), सौ. शालनताई श्रीरंग रासकर (वाडेगव्हाण), सौ. स्वातीताई विठ्ठल घावटे (रामलिंग), सौ. पुजाताई रवींद्र पडळकर (मावळेवाडी), श्री. लक्ष्मण कर्डिले (तर्डोबावाडी) व सदस्यांचा श्री. शिवाजी शिर्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश औटी यांनी प्रास्ताविक केले आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामविकासाला दिशा देणार्‍या राळेगणसिद्धीच्या मातीत नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार होत असल्याने हे तुमचे सर्वांचे भाग्य असल्याचे श्री. शिर्के यांनी यावेळी स्पष्ट केले.

अण्णांच्या गावातील मातीत मिळालेला हा सत्कार तुम्हाला गावात काम करताना उर्जा देणारा ठरणार असल्याने आपआपल्या गावात काम करताना समाजाला दिशा देण्याचे काम आपण कराला असा आशावादही श्री. शिर्के यांनी व्यक्त केला. रमेश औटी यांच्या संघटनकौशल्यासह मित्रपरिवार जपण्याच्या हातोटीचेही त्यांनी कौतुक केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...