spot_img
अहमदनगरAhmednagar BJP News : मुंढे बंधुंवरील खोट्या गुन्ह्याची चौकशी करावी, अन्यथा जिल्हाभर.......

Ahmednagar BJP News : मुंढे बंधुंवरील खोट्या गुन्ह्याची चौकशी करावी, अन्यथा जिल्हाभर…. ;जिल्हा भाजपचा इशारा

spot_img

Ahmednagar BJP News :  अहमदनगर / नगर सह्याद्री – भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे व त्यांचे बंधू शासकीय ठेकेदार उदय मुंढे यांच्यावर शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तालुयाचे महसूल विभागातील अधिकार्‍यांनी संगमत करून वाळू चोरीचा गुन्हा कुठलीही शःनिशा न करता खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशानेच हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सखोल पारदर्शीपणे चौकशी करावी हा खोटा गुन्हा तातडीने रद्द करून खोटा गुन्हा दाखल करण्यास सहभागी असलेल्या अधिकारी व संबंधीत व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, भाजपा जिल्हाभर आंदोलने करेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पोलीस उपाधिक्षक प्रशांत खैरे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष व प्रदेश चिटणीस अरुण मुंढे व त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्या विरोधात शेवगाव तहसीलदार यांच्या कार्यालयामार्फत वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ जिल्हा, नगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस उपाधिक्षक प्रशांत खैरे यांना जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने दिले. यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाळासाहेब सोनवणे, शाम पिंपळे, महिला जिल्हध्यक्षा अश्विनी थोरात, मनोज कुलकर्णी, बाळासाहेब महाडिक, सुभाष दुधाडे आदीसह प्रत्येक तालुयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिलीप भालसिंग म्हणाले, दि.२३ नोव्हेंबर रोजी गावातील सरपंच वाळू नसल्याची तक्रार करतात, त्यानंतर ३० नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पंचनामा करून वाळू आहे. त्याच ठिकाणी असल्याचे सांगून वाळू सरपंचांच्या ताब्यात दिली जाते. असे असतानाही अरुण व उदय मुंढे यांच्यावर महसूल खात्याचे अधिकारी वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल करतात. पोलिसांनी दिलेल्या दम व दबावामुळे महसूल अधिकार्‍यांनी हा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जात आहे. हे राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशानेच केलेले आहे. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाली तर आम्ही ते सहन करणार नाही.

यावेळी विवेक नाईक,बाबासाहेब सानप, तुषार पोटे, दादा बोठे, शरद बारस्कर, अरविंद कारंजकर, अरुण जगताप, राहुल तांबे, सुमित बटूळे, ज्ञानेश्वर धिरडे, लक्ष्मिकांत तिवारी, बाळासाहेब भुजबळ, बबनराव आव्हाड, सुरेश मानकर, रुद्रेश अंबाडे, कैलास गर्जे, अनिल ढवन, रियाज कुरेशी, कदीर शेख, गणेश भालसिंग, विद्या शिंदी, अर्चना चौधरी, विजया अल्हाटे, मुबारक सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपाधिक्षक प्रशांत खैरे यांनी या प्रकारातील संबधित अधिकार्‍यंना बोलावून सखोल चौकशी करू, असे आश्वसन भाजपच्या शिष्ठमंडळास दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...