spot_img
अहमदनगरAhmednagar: डॉक्टर निघाला नराधम!! अल्पवयीन मुलीसोबत घडलं 'भयंकर'; भर दुपारी क्लेनिकचा दरवाजा...

Ahmednagar: डॉक्टर निघाला नराधम!! अल्पवयीन मुलीसोबत घडलं ‘भयंकर’; भर दुपारी क्लेनिकचा दरवाजा केला बंद..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
उपचारासाठी लिनीकमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर (वय १७) डॉटरानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुयातील एका गावात घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून डॉटर विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोसो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. अंगद सदाशिव खाडे (रा. विळद ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉटरचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस (१४ फेब्रुवारीपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. खाडे याच्या क्लिनिकमध्ये रविवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आली. त्याने तिच्यावर उपचार करण्याचा बहाणा करून इच्छेविरूद्ध वारंवार अत्याचार केला.

हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यांच्यासह पीडितीने सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पीडितने यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी डॉ. खाडे विरोधात अत्याचार, पोसो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक भोसले करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...