अहमदनगर । नगर सहयाद्री
शहरातील व्यापारी रमेश मुनोत आणि त्यांची पत्नी चित्रा मनोज यांची निर्घृण हत्या केल्याची घटना 2007 मध्ये घडली होती. या हत्यामध्ये चौकीदार साकेत, त्याचे दोन मित्र आणि मुनोत यांच्या तीन माजी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या गुन्ह्यामध्ये या आरोपींनी दरोडा आणि खुनाचा कट रचुन तो तडीस नेला होता.
या सगळ्या प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु पुढे मुंबई उच्च न्यायालयाने चौकीदार साकेत याच्या शिक्षेमध्ये वाढ करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द केली.
सादर करण्यात आलेल्या तपशीलावरून आम्ही या निष्कर्षाला आलो आहोत की, हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत बसत नाही. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने नोंदवलेले निष्कर्ष एकतर्फी किंवा अशक्य असल्याचे आढळून येत नाही, तोपर्यंत उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये,’ असे न्यायालयाने नमूद केले.