spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: माजी नगरसेवकांकडून ठेकेदाराला मारहाण! कारण काय आलं समोर..

Ahmednagar Crime: माजी नगरसेवकांकडून ठेकेदाराला मारहाण! कारण काय आलं समोर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
उसणे दिलेले पैसे चार लोकांत मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव व इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली. चेतन शशीकांत अग्रवाल (वय ३१ रा. बुरूडगाव रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मंगलगेट परिसरात सचिन जाधव याच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या चेतन यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सचिन जाधवसह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तुकाराम जाधव (रा. रामचंद्र खुंट), प्रेम काळे, प्रशांत काळे, अभिजित तांबडे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

चेतन यांनी सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी सचिनला वाळवणे गावातील यात्रेच्या दिवशी उसणे पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी चेतन हे सचिनच्या मंगलगेट येथील कार्यालयात १२ मे रोजी दुपारी गेले होते. चेतन यांनी पैशाची मागणी केली असता सचिनने शिवीगाळ करून चार लोकांत पैसे मागतो का? असे म्हणून मारहाण केली. धारदार वस्तूने डोयात मारून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रेम, प्रशांत व अभिजित यांनी देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी (१२ मे) मंगलगेट येथे दोन गटांत हाणामारीची घटना घडली होती. यात जखमी झालेले सचिन जाधव यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेत असताना बातमीसाठी मोबाईलमध्ये चित्रिकरण करत असलेल्या पत्रकाराला सचिन जाधव व त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मोहमंद हसन इदरीस सय्यद (वय २० रा. मुकुंदनगर) असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी दिलेल्या जबाबावरून सचिन जाधवसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपुरात शिंदे गटाला दुहेरी धक्का; काय घडलं पहा

प्रभाग १७ मधून उमेदवारांची अचानक माघार, तर प्रभाग ८-अ पूर्णपणे रिकामा श्रीरामपूर / नगर सह्याद्री...

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...