spot_img
अहमदनगरकचरा डेपोला वारंवार आग! आयुक्तांनी काढले ठेकेदाराला आदेश, भरावा लागणार इतका दंड?

कचरा डेपोला वारंवार आग! आयुक्तांनी काढले ठेकेदाराला आदेश, भरावा लागणार इतका दंड?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
बुरुडगाव कचरा डेपोत १०० टन क्षमतेच्या खत प्रकल्पातील कचर्‍याला वारंवार आग लागण्याची घटना घडत आहेत. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण झाल्याचा अहवालही दिला आहे. महापालिकेने वारंवार सूचना देऊनही व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करूनही सुरक्षेबाबत ठेकेदार संस्थेने उपाययोजना न केल्याने मागील महिन्यात पुन्हा आग लागली. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार ठेकेदार संस्थेला नोटीस बजावून एप्रिल २०२३ पासून प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.

बुरुडगाव येथील १०० टन क्षमतेच्या खतनिर्मीती प्रकल्पात मागील वर्षी एप्रिल महिन्यात मोठी आग लागली होती. वर्षभरानंतरही या आगीची धग कायम असल्याने व धुरामुळे वायूप्रदूषण होत असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. त्यानंतरही उपाययोजना न केल्याने १९ एप्रिल रोजी दुपारी पुन्हा आग लागली. हा प्रकल्प चालवणार्‍या मे. मायोव्हेसल्स अ‍ॅन्ड मशीन्स या संस्थेने सुरक्षेविषयक उपाययोजना करणे आवश्यक होते.

तसे न केल्याने ही आग लागल्याचे घनकचरा विभागाने म्हटले आहे. मनपाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करुन देखील सदर संस्थेने उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रकार मनपाची फसवणूक व नुकसान करणारा आहे. करारनाम्यातील अटीनुसार याबाबत प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार एप्रिल २०२३ पासून दंड आकारणी करण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....