spot_img
अहमदनगरनगर हादरले! धाकट्या भावाने केला मोठ्या भावावर वार; वाचा अहिल्यानगर क्राईम

नगर हादरले! धाकट्या भावाने केला मोठ्या भावावर वार; वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
स्टेशन रोडवरील न्यू बेथेल कॉलनीत कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्‌‍यात प्रदीप किसन साठे (वय 40) हे जखमी झाले असून, त्यांनी धाकटा भाऊ सुमीत उर्फ निखील किसन साठे (वय 38, रा. न्यू बेथेल कॉलनी) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. प्रदीप साठे हे पत्नी व मुलांसह काही काळापासून विनायकनगर येथे सासरी राहत होते. दोन महिन्यांपूव डोळ्याच्या ऑपरेशनमुळे नोकरी गेल्याने ते आपल्या आई-वडिलांच्या घरी न्यू बेथेल कॉलनीत परतले. त्यांचा लहान भाऊ सुमीत याला दीर्घकाळापासून दारूचे व्यसन असून, तो अनेक वर्षांपासून एकटाच राहत होता. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता, सुमीत दारूच्या नशेत घरी आला आणि मोठा भाऊ प्रदीप यांना तू इथे राहायचे नाही, नाहीतर तुझा मुडदा पाडीन अशी धमकी देत शिवीगाळ केली. यावर प्रदीप यांनी प्रतिकार केला असता, सुमीतने हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष बनकर करत आहेत.

कायनेटिक चौकात वेटरला लुटले!
शहरातील कायनेटिक चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री वेटर म्हणून काम करणाऱ्या युवकाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हसनेन मोहमदपजीर शेख (वय 23, रा. कायनेटिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. हसनेन हे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. मंगळवारी, 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 1 वाजता, ते त्यांच्या मित्रांसह रणजीत हॉटेलजवळून पायी त्यांच्या रूमकडे जात होते. त्याचवेळी, काळ्या रंगाच्या विना नंबरच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. काही कळायच्या आत चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि हसनेन यांच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल व 2 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेत दोघे चोरटे मोटरसायकलवरून पसार झाले. या घटनेनंतर हसनेन शेख यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

भिस्तबाग चौकातील ‌’तळीराम‌’ अडकला जाळ्यात
शहरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकात मंगळवारी रात्री दारूच्या नशेत बाईक चालवणाऱ्या इसमावर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे. अत्यंत बेदरकार व निष्काळजी पद्धतीने वाहन चालवून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव तेजस बाबासाहेब काकडे (वय 36, मूळ रा. डिग्रस, ता. राहुरी) असे आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई संतोष शिवाजी मेसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. असून, तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भिस्तबाग चौकात नाकाबंदी करत असताना, रात्री 7.45 वाजता, तेजस काकडे हा (एम.एच. 17 ए. यु. 6133 ) दुचाकीवरून अत्यंत निष्काळजीपणे व झिगझॅग पद्धतीने वाहन चालवताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली असता, तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली असता, त्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. याप्रकरणी तेजस काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जे. एन. आव्हाड करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आंदोलकांवरील ११ गुन्हे मागे घेण्यास मान्यता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान नगर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी...

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मोठी माहिती, वाचा पत्रकार परिषद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस निधी देण्यात...

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा; ठाकरे गटाची मागणी, तहसीलदारांना निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या, घरे व पशुधनाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने...

जिल्हा बँकेच्या ‘इमारती’ वरून राजकारण तापले; महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

जळगाव । नगर सहयाद्री:- जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या ऐतिहासिक 'दगडी इमारत' विक्रीचा निर्णय सध्या जिल्ह्यात...